सोलापूर (प्रतिनिधी)- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि यशोधरा ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स यांच्यात महत्त्वपूर्ण शैक्षणिक सहकार्य घडवून आणणारा सामंजस्य करार शनिवारी विद्यापीठात पार पडला. या कराराच्या माध्यमातून "डिप्लोमा इन इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस" हा एक वर्षाचा अभ्यासक्रम आता सोलापुरात सुरू होणार असून, तो वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी मोलाचा ठरणार आहे.विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर आणि यशोधरा हॉस्पिटलचे चेअरमन बसवराज कोलूर प्रमुख उपस्थित झालेल्या या करारावर विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे आणि यशोधरा ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर पुजारी यांनी स्वाक्षऱ्या केल्या.या कराराच्या माध्यमातून "डिप्लोमा इन इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस" हा एक वर्षाचा अभ्यासक्रम आता सोलापुरात सुरू होणार सदर अभ्यासक्रम केवळ पुणे, मुंबई, बेंगळुरू यांसारख्या महानगरांपुरता मर्यादित होता. मात्र, आता तो सोलापुरातही उपलब्ध झाल्याने येथील वैद्यकीय विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी स्थानिक स्तरावर उत्तम पर्याय मिळणार आहे. आपत्कालीन वैद्यकीय सेवा ही आजच्या आरोग्य क्षेत्रातील एक अत्यंत गरजेची आणि गतिशील शाखा असून, या कोर्सद्वारे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव व तांत्रिक कौशल्य मिळणार आहे. या कार्यक्रमास विद्यापीठाचे वित्त व लेखाधिकारी सीए महादेव खराडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजीत जगताप, कायदा अधिकारी ॲड. जावेद खैरदी, परीक्षा विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे, डॉ. विकास पाटील यांच्यासह विद्यापीठ व यशोधरा हॉस्पिटलचे अनेक मान्यवर उपस्थित होते. हा करार सोलापूरसाठी केवळ शैक्षणिकदृष्ट्या नव्हे, तर आरोग्यसेवा क्षेत्राच्या विस्ताराच्या दृष्टीनेही एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.
सोलापूर विद्यापीठ आणि यशोधरा हॉस्पिटल यांच्यात सामंजस्य करार! ;डिप्लोमा इन इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस अभ्यासक्रम सोलापुरात सुरू होणार
byदैनिक लोकशाही मतदार
-
Tags
सोलापूर
