सोलापूर (प्रतिनिधी)- सोलापूर महानगरपालिका बांधकाम परवाना विभागाचे उप अभियंता नीलकंठ मतपती हे गेल्या अनेक वर्षापासून महानगरपालिका बांधकाम परवाना विभाग येथे आपल्या पदाचा दुरुपयोग करून लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केला आहे.बांधकाम परवाना विभाग येथे अनेक बांधकाम परवाना, वापर परवाना, हार्डशिप, अनेक प्रकरणात प्रत्येक फाईल मागे लाखो रुपये उचलले आहे.सोलापूर शहरात अनेक अनधिकृत इमारतीवर कारवाई साठी नोटिसा पाठवून वरिष्ठ अधिकाऱ्यांना ना,सांगता परस्पर अनधिकृत इमारतींच्या मालकांकडून प्रकरण दाबण्याच्या नावाखाली लाखो रुपयेचा भ्रष्टाचार उप अभियंता नीलकंठ मठपती यांनी केला आहे.बांधकाम परवाना विभागात माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी मागितलेली माहिती न देऊन स्वतःच्या भ्रष्टाचार यांनी लपवलेला आहे.शहरातील अनेक बिल्डर्स, डेव्हलपर्स वेगवेगळे माफियांसोबत आर्थिक संगणमत करून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करून आपल्या पदाचा दुरुपयोग केला आहे अनेक अनाधिकृत इमारतीवर कारवाईसाठी अनेक लोकांनी त्यांच्याकडे तक्रारी अर्जाच्या माध्यमातून पाठपुरावा केल्यानंतर त्या तक्रारदारांना फक्त कागदावर कारवाई दाखवून अनेक अनधिकृत बिल्डिंग माफियाना पाठीशी घालण्याचा काम उप अभियंता मठपती यांनी करत आहे.उपअभियंता नीलकंठ मठपती यांनी आजपर्यंत ज्या ज्या टेबलवर कार्यरत असून काम केला आहे त्या सर्व टेबलचे आज पर्यंत केलेल्या सर्व प्रकरणाची व प्रत्येक फाईललाची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून तपासणी करावी.बांधकाम परवाना विभागात कार्यरत असलेले उपअभियंता नीलकंठ मठपती यांची खातेनिहाय चौकशी करून तात्काळ निलंबनाची कारवाई करा म्हणून दिनांक 28 ऑक्टोबर मंगळवारपासून सादिक शेख यांनी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय पुनम गेट येथे आमरण उपोषणाची सुरुवात केली आहे.जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सोडणार नाही- माध्यमांशी बोलताना सादिक म्हणाले आहे की सोलापूर महानगरपालिका बांधकाम परवाना विभाग चे उप अभियंता नीलकंठ मठपती यांच्या भ्रष्टाचाराबाबत गेल्या एक वर्षापासून सादिक शेख हे मंत्रालय, विभागीय आयुक्त पुणे, सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर महानगरपालिका कार्यालय, यांच्याकडे वेळोवेळी तक्रारी अर्जाच्या माध्यमातून पाठपुरावा केला असून आज पर्यंत सोलापूर महानगरपालिका कार्यालयाच्या वतीने सादिक शेख यांच्या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही.वरिष्ठ अधिकारी अश्या भ्रष्ट अभियंत्याला पाठीशी घालत आहेत असा आरोप करत सदिक शेख हे दिनांक 28 ऑक्टोबर मंगळवार पासून सोलापूर जिल्हा अधिकारी कार्यालय पूनमगेट येथे बांधकाम परवाना विभागाचे उप अभियंता नीलकंठ मठपती यांची खातेनिहाय चौकशी करून तात्काळ निलंबनाची कारवाई म्हणून आमरण उपोषण सुरू केले आहे.जोपर्यंत पर्यंत उप अभियंता नीलकंठ मठपती यांच्यावर कारवाई होत नाही तो पर्यंत सादिक शेख अमरण उपोषण सोडणार नाही असा इशारा सादिक शेख यांनी दिला आहे.
