सोलापूर (प्रतिनिधी)-आद्य कवी महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या जयंती सप्ताह निमित्त महेश अण्णा कोठे सामाजिक संस्था संचलित चक्रवर्ती सम्राट अशोक असंघटित कामगार संघटना वतीने संस्थापक अध्यक्ष श्रीकांत गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बांधकाम कामगार बंधू-भगिनींची व त्यांच्या कुटुंबीयांची मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाखाचे विमा कार्ड देण्यात आले श्रीकांत गायकवाड हे एक गोर गरिबांसाठी मदतीला धावून जाणारे तसेच त्यांची नेहमीच वंचित पिडीत अन्यायग्रस्तांसाठी तळमळ दिसून येते.सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे श्रीकांत गायकवाड यांच्या कार्यक्रमास प्रचंड प्रतिसाद नेहमीच असतो त्यामुळे गोरगरिबांचा आधारवड अशी त्यांची ख्याती निर्माण झाली आहे. कार्यक्रम प्रसंगी ज्येष्ठ नागरिक सामाजिक कार्यकर्ते हनुमंत देसाई मामा अंबलगी मामा कोळी मामा प्रकाश हुंडेकरी गोविंद शिकलकर देविदास रणखांबे प्राजक्ताताई गायकवाड सिद्धार्थ गायकवाड स्नेहा चिंता कंदी पूनम गायकवाड उपस्थित होते
Tags
सोलापूर