सोलापूर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२५ करीता उत्तर सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद गट निहाय व पंचायत समिती गणनिहाय प्रारुप मतदार यादी दि.०८ ऑक्टोबर २०२५ रोजी तहसिल कार्यालय उत्तर सोलापूर, पंचायत समिती कार्यालय उत्तर सोलापूर तसेच गावामध्ये तलाठी चावडी व ग्रामपंचायत कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात आली आहे.तरी उत्तर सोलापूर तालुक्यातील नागरीकांनी प्रारुप मतदार यादीची कार्यालयीन वेळेत उपरोक्त ठिकाणी पाहणी करावी. तसेच प्रारुप मतदार यादी संदर्भात आक्षेप किंवा हरकती असल्यास दि.०८ ते दि.१४ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत मा. जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर व तहसिल कार्यालय उत्तर सोलापूर येथे लेखी स्वरुपात विहित पध्दतीने सादर कराव्यात. विहित कालावधीनंतर प्राप्त होणा-या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही. असे तहसिलदार निलेश पाटील यांनी पत्राद्वारे कळविले आहे.
.jpeg)