बहुजन नायक मा.कांशिरामजी यांच्या स्मृती दिनानिमित्त ब.स.पा च्या वतीने अभिवादन सभा व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन

 




सोलापूर (प्रतिनिधी)- सोलापूर, डी.एस.फोर, बाससेफ व ब.स.पा.चे संस्थापक बहुजन नायक मा. कांशिरामजी यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्र प्रदेश युनिटच्या वतीने अभिवादन सभा व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन गुरूवार दि. ०९/१०/२०२५ रोजी सायंकाळी ५.०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, न्यु. बुधवार पेठ, सोलापूर या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमास ब.स.पा.चे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश प्रभारी माजी राज्यसभा खासदार मा. राजाराम साहेब तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अॅड. सुनिल डोंगरे साहेब हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून या कार्यक्रमास मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमास बहुजन समाज पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी, पदाधिकारी हे देखील उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या सुरूवातीला ब.स.पा. पार्टीचे राष्ट्रीय प्रबोधनकार गायक विशाल मोरे यांच्या भिमगीत गायनाचा कार्यक्रम सुद्धा आयोजित केलेला आहे. सदर कार्यक्रमाचे आयोजन ब.स.पा., सोलापूर जिल्हा कमिटीच्या वतीने करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमास सोलापूर शहर-जिल्ह्यातील तमाम आंबेडकरी जनतेने तसेच बहुजन समाज पार्टीच्या सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, हितचिंतक यांनी मोठ्या संख्येने हजर राहावे असे आव्हान पार्टीचे प्रदेश सचिव अॅड. संजीव सदाफुले, प्रदेश सचिव अप्पासाहेब लोकरे, जिल्हाध्यक्ष बबलू गायकवाड व शहर अध्यक्ष देवा उघडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form