गुरववाडीचे विकासरत्न सरपंच तथा विकासरत्न माळप्पा पुजारी यांची सचिन जोकारे विमा सेवा केंद्राला सदिच्छा भेट

 


सोलापूर (प्रतिनिधी)- गुरववाडीचे विकासरत्न तथा सरपंच माळप्पा पुजारी यांनी सचिन जोकारे विमा सेवा केंद्र, एलआयसी संपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी विमा सल्लागार सचिन जोकारे यांनी सरपंच माळप्पा पुजारी यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार केला.या भेटीदरम्यान सरपंच माळप्पा पुजारी यांनी गुरववाडी गावात विमा जनजागृतीसाठी कार्यक्रम आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली. ग्रामस्थांना विम्याचे महत्त्व आणि त्यातून मिळणारे संरक्षण याबाबत मार्गदर्शन व्हावे, अशी विनंती त्यांनी सचिन जोकारे यांना केली.सदर भेटीदरम्यान एलआयसीच्या विविध योजना, विमा सुरक्षा आणि गुंतवणूक संधी याबाबत सचिन जोकारे यांनी सरपंच पुजारी यांना सविस्तर माहिती दिली. भेट सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form