बांधकाम कामगार मनीषा गुर्रम यांच्यावर कारवाई करा ; विष्णू कारमपुरी (महाराज) यांची मागणी

 


सोलापूर (प्रतिनिधी)-बांधकाम कामगार मनीषा गुर्रम यांनी खोटी कागदपत्रे दाखल करून, बांधकाम कामगार योजनेतील आर्थिक लाभ मिळविले आहेत., म्हणून त्यांची तपासणी करून कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष विष्णू कारमपुरी (महाराज) व सेक्रेटरी सोहेल शेख यांनी लेखी तक्रारी निवेदनाद्वारे सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याकडे केली आहे.सहाय्यक कामगार आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात सध्या शासनाच्या माध्यमातून व सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामार्फत बांधकाम कामगार योजनेचा लाभ मिळविण्यासाठी खोटी कागदपत्रे सादर करून, लाभ मिळविल्याचे अनेक प्रकरणे उघडकीस येत आहेत, अशा तच भर म्हणून सोलापूरच्या खाजगी एजंट असलेल्या मनीषा गुर्रम या बांधकाम कामगार योजनेतून योजना क्र१. H01 नैसर्गिक प्रसूतीचा 15000 रुपये लाभ घेतला २. गृह उपयोगी भांडी संच ३. सुरक्षा किट संच असे तिन्ही प्रकारचे लाभ घेतले आहेत. इतकेच नव्हे तर त्या ठेकेदार म्हणून शेकडो लोकांना सही शिक्के दिलेले आहेत हे बेकायदेशीर व सरकारी पैशाचा अपहार केला आहे. हे कायद्याने गुन्हा आहे तरी माननीयांनी वरील निवेदनाचे गांभीर्याने दखल घेऊन सखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी त्याचबरोबर त्यांनी कोणाकोणाला लाभ मिळवून दिले याचीही चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी असे नमूद करण्यात आले आहे. विष्णू कारमपुरी (महाराज) यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात सोहेल शेख, रेखा अडकी, पप्पू शेख, विठ्ठल कुराडकर, श्रीनिवास बोगा, गुरुनाथ कोळी यांचा समावेश होता

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form