सोलापूर (प्रतिनिधी)- महानिर्मिती, महापारेषण व महावितरण या तिन्ही वीज कंपन्यात सुरु असलेले खासगीकरण, महावितरण कंपनीच्या नफ्याच्या क्षेत्रात टोरंटो, अदानी व इतर खासगी भांडवलदारांना समांतर वीज वितरणाचा परवाना, एकतर्फी पुनर्रचना लागू करणे, वीज कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करणे व इतर धोरणात्मक विषयावर कृती समितीने गेल्या पंधरा दिवसां पासून क्रमबद्ध आंदोलन सुरू केले आह्मात्र अदयाप या विषयावर तोडगा निघाला नसल्याने पुनर्रचनेस संयुक्त कृती समितीच्या वतीने सुरुवातीला तीन दिवसांचा संप करणार व तोडगा न निघाल्यास बेमुदत कामबंद आंदोलन पुकारणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंता, अधिकारी कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे.जानेवारी २०२३ पासून ज्वलंत व महत्वाच्या विषयांबाबत कृती समिती सातत्याने शासन व प्रशासना सोबत पत्र व्यवहार करत आहे. दि.४ जानेवारी २०२३ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिन्ही वीज कंपन्यांचे व्यवस्थापन व कृती समिती यांची सयुक्त बैठकीत तिन्ही वीज कंफ्यांमध्ये कोणत्याही पद्धतीचे खासगीकरण करण्यात येणार नाही. उलट या कपन्यांच्या आर्थिक बळकटीकरीता राज्यशासन ५० हजार कोटीचे अर्थसहाय्य करणार असल्याची ग्वाही दिली होती. त्यामुळे कृती समितीने तेव्हा संप स्थगित केला होता. मात्र आश्वासनाचा भंग करत तिन्ही चीज कपन्यांच्या प्रशासनाने विविध मागनि खाजगीकरणाची प्रक्रिया सुरू केल्याने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवार दि.9 ते शनिवार दि.११ ऑक्टोंबर पर्यंत तीन दिवसाचा संप करण्याचा निर्णय कृती समितीने जाहीर केला आहे. विशेष म्हणजे कामगारांच्या कुठल्याही आर्थिक मागण्या या संपात नसल्याचे पत्रकार परिषदेत देण्यात आले.या पत्रकार परिषदेस महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे संयुक्त सचिव विलास कोले, सबॉर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशनचे सहसचिव उल्हास कानगुडे, तांत्रिक कामगार युनियनचे केंद्रीय उपसरचिटणीस नितीन चव्हाण, महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे झोन सचिव विजयकुमार राकले, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटचे मंडल अध्यक्ष एनटी. मुजावर, माजी केंद्रीय उपाध्यक्ष पी.एल. जाधव, महाराष्ट्र राज्य वीज कामगार काँग्रेस (इंटक) चे लॉरेन्स डोंगरे, सिद्राम चव्हाण, सबॉर्डिनेट इंजिनियर्सचे मंडळ सचिव जुबेर शेख, तांत्रिक कामगार युनियनचे झोन अध्यक्ष एल.डी. चव्हाण, महाराष्ट्र वीज कामगार महासंघ झोन उपाध्यक्ष संजय जाधव वर्कर्स फेडरेशनचे प्रवीण माने पाटील, महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी विद्युत वर्कर्स युनियन आदि प्रमुख सात संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते.
