डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमान कारक शब्द वापरणारा ॲड.अनिल मिश्रा याच्यावरती तात्काळ राष्ट्र द्रोही गुन्हा करा अन्यथा तीव्र आंदोलन उभारू : सोलापूरात बहुजन समाज पक्ष आक्रमक

 


सोलापूर (प्रतिनिधी)- शूद्र प्रवृत्तीचा ॲड.अनिल मिश्रा याने संविधान रचेता, जगाने ज्ञानाचे प्रतीक म्हणून स्वीकारले अशा ज्ञान सूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अतिशय वाह्यात आणि अपमान कारक शब्द वापरून अवमान केला आहे. एका व्हिडिओ रील मध्ये बोलताना तो बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलताना असे म्हणाला की, "गन्दे व्यक्ति का जो कि अंग्रेजों कि गुलामी करता रहा, झूठ बोलता रहा संविधान आंबेडकर ने नहीं बी. एन. राव ने लिखा है " अशा शब्दांत त्याने बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत अपशब्द वापरुन संपूर्ण जगासमोर स्वतः चे तोंड काळं केले आहे. आम्ही आपणांस विनंती करतो की अशा राक्षसी वृतिच्या नराधमा वरती तात्काळ गुन्हा दाखल करावा व त्याची तुरुंगात रवानगी करावी.अन्यथा बहुजन समाज पार्टी अशा देशद्रोही दानवी प्रवृत्तीच्या विरोधात देशभर आंदोलन पेटवेल याची दखल घ्यावी.तसेच भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश गवई साहेब यांच्यावरही एका मातेफेरू वकिलाने बुट फेकण्याचा प्रयत्न केला आहे. या कृत्याचा बहुजन समाज पार्टी जाहीर निषेध करीत आहे तरी या वकिलावरती कायदेशीर कडक कारवाई करावी अश्या मागणीच्या आशयाचे निवेदन बहुजन समाज पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आले आहे.याप्रसंगी रामचंद्र जाधव  ॲड. संजीव सदाफुले अप्पासाहेब लोकरे बबलू गायकवाड देवा उघडे सुहास सुरवसे रशिदभाई सरदार (म.प्र. मुस्लिम भाईचारा) अमर साळवे यांच्यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form