सोलापूर (प्रतिनिधी)- माजी आमदार दिलीपराव माने यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात लौकीक असलेल्या ब्रह्मदेवदादा माने सहकारी बँकेने २ ऑक्टोंबर रोजी सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केले असून याचा आम्हास अभिमान आहे. बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात बँकेच्या माध्यमातून विविध कार्यक्रमाचे नियोजन करीत असुन सभासद, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक यांचा दिवाळीचा आनंद व्दिगुणीत करण्यासाठी रविवार दि. १९/१०/२०२५ रोजी पहाटे ५.३० वा. झी मराठीवरील सारेगमप शो महाविजेती कार्तीकी गायकवाड यांच्या 'दिवाळी पहाट गाणी' या कार्यक्रमाचे आयोजन के.एल.ई स्कूल मैदान, डी मार्ट शेजारी, जुळे सोलापूर येथे करण्यात आले असून या कार्यक्रमास सर्वांनी सहपरिवार उपस्थित रहावे असे आवहान बँकेचे वतीने करीत आहोत.स्वातंत्र्यपूर्वी काळापासुन सोलापूरची ओळख ही गिरणगांव व कामगाराचं शहर म्हणून होती. जूनी मिल, नरसिंग गिरजी, जाम मिल, लक्ष्मी विष्णु मिल अश्या जगप्रसिध्द गिरण्या होत्या. यामध्ये हजारो कामगार काम करीत होते. मात्र प्रापंचीक आर्थिक ओढाताणीमुळे ते सावकारी कर्जाचे विळख्यात जात असल्याने सहकार तपस्वी स्व. ब्रह्मदेवदादा माने यांनी २ ऑक्टोंबर १९७६ रोजी यशवंत सहकारी कामगार बँकेची स्थापना केली. व १ एप्रिल १९७९ रोजी जागतीक किर्तीचे अर्थतज्ञ वि.म. दांडेकर यांच्या हस्ते व आमदार कॉम्रेड दत्ता देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बँकेचे उद्घाटन करण्यात आले. कामगाराच्या जीवनाला कलाटणी देणारी ही बैंक ठरली. स्व. दादांनी पार्क चौक येथे पहिली शाखा सुरू केली. या नंतर दमाणी नगर, कुमठे, विजापूर रोड, सिध्देश्वर पेठ, अशोक चौक, कोडी येथे शाखा सुरू केल्या तर २००१ मध्ये बँकेचा रौप्य महोत्सव विविध उपक्रमानी साजरा करण्यात आला.बँकेचे संस्थापक अध्यक्ष महकार तपस्वी स्व. ब्रहादेवदादा माने यांचे ३ सप्टेंबर २००२ रोजी निधन झाले. टमटम चालकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेल्या आंदोलनादरम्यान त्यांची प्रकृती ढासळत गेली. मात्र शेवटच्या धामापर्यंत ते गोर-गरीब, उपेक्षितचीत कष्टकरी, बमीक वर्गाच्या न्यायासाठी हयातभर लढले. दादांचे निधनानंतर बँकेची जबाबदारी मा. दिलीपराव माने यांच्यावर आली. स्व.दादांनी घालून दिलेला आदर्श, संस्कार, विचार घेऊन त्यांनी अतिशय जिद्दीने, चिकाटीने व शिस्तबध्यतेने बैंक चालवून सहकार क्षेत्रात नया आदर्श निर्माण केला. स्व. दादांचे कार्य समाजासाठी दिप स्तंभासारखं होते. म्हणूनच यशवंत सहकारी बँकेचे नांव 'ब्रह्मदेवदादा माने सहकारी बैंक' करण्याचा सभासदांनी सर्वसाधारण सभेत आग्रह केला. दादांच्या नावाने असलेली बँक, बँकेचे मार्गदर्शक माजी आमदार दिलीपराव माने यांनी अतिशय आत्मविश्वासाने व तेवढ्याच यशस्वीपणे चालवून बँकेस राज्यात लौकीक मिळवून दिला. दिवसे दिवस रिझर्व्ह बँकेचे कठोर नियम, नागरी बैंक समोर असलेली आव्हाने अधिक कठीण असताना बैंकेने ग्राहकांची विश्वासाहर्ता जपत यशोमय आलेख सतत उंचावत ठेवला आहे.ब्रह्मदेवदादा माने बँकेच्या दमाणी नगर, सिध्देश्वर पेठ, कोंडी, अशोक चौक, मार्केट यार्ड, सुमित्रा पार्क जुळे सोलापूर, पुणे येथे स्व मालकीच्या जागा असून दिलीपराव माने यांच्या कालावधीत मार्केट यार्ड, बीएमआयटी कॅम्पस्, तुळजापूर, मंगळवेढा, करमाळा, सांगोला, मंगरूळ, पूणे, सांगली, बार्शी, सुमित्रा पार्क, एसआरपी कॅम्पस्, अंत्रोळीकर नगर, कुरूल शाखा सुरु करण्यात आल्या असून बँकेच्या २३ शाखा व १३ एटीएममधुन ग्राहकांना सेवा देत आहे. आयुनिक काळाची गरज ओळखून ग्राहकांना कोअर बँकीग प्रणाली (सी.बी.एस.), एस.एम.एस. बँकीग सेवा, एन.सी.एच., डि.बी.टी.एल. सुविधा, आर.टी.जी.एस., एन.ई.एफ.टी., क्यु.आर. कोड सुविधा, सि.टी.एस. क्लिरींग, मोबाईल बँकींग अंतर्गत आय.एम.पी.एस. आणि यु.पी.आय. पेमेंट सुविया, डेबीट कार्ड व्दारे देशाअंतर्गत पी.ओ.एस. / ई-कॉम ऑनलाईन व्यवहाराची सुविधा उपलब्ध करून दिल्या असून बँकेचे अद्यावत डेटा सेंन्टर मार्केट यार्ड, सोलापूर व डी.आर. साईट पुणे येथे कार्यान्वीत आहे.स्व. दादांचा वारसा घेऊन दिलीपराव माने यांनी आपल्या नेतृत्व, कर्तृत्व व कल्पकतेने बँकेस ग्राहकांची विश्वासार्हता मिळवून दिली. बँकेने सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केले असून बँकेच्या इतिहासातील हा सोनेरी क्षण आहे हा यशोमय आनंद व वाटचालीचा आनंद वर्षभर साजरा करीत आहोत. दिवाळीचा आनंद व्दिगुणीत करण्यासाठी सुरेल मैफील स्वरानुभती हा ख्यातनामक गायीका कार्तीकी गायकवाड यांचा कार्यक्रम दिवाळीच्या आरंभ दिनी रविवार दि.१९ ऑक्टोंबर २०१५ रोजी पहाटे ५.३० वाजता के. एल.ई. स्कूल मैदान (डि मार्ट शेजारी) जुळे सोलापूर येथे आयोजित केलेले आहेत. या कार्यक्रमाच्या आस्वाद आपण सहपरिचारासह उपस्थित राहून प्याया असे आवहान बँकेचे यतीने करीत आहेत.या कार्यक्रमाच्या शुभारंभास मा. जिल्हाधिकारी कुमार आर्शीवाद, सोलापूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक सचिन ओंबासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम, सोलापूर शहरचे पोलिस आयुक्त एम राजकुमार, सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी, सह, संस्थाचे जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड, सोलापूर ग्रामीणचे पोलिस उपायुक्त प्रितम यावलकर, सोलापूर शहरचे पोलिस उपायुक्त विजय कबाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता शाम कुंभार, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधिक्षक अभियंता सुचिरेंद्र खांडेकर, भिमा कालवा मंडळाचे अधिक्षक अभियंता चिरज साळे, विज वितरणचे अधिक्षक अभियंता सुनिल माने, डॉ. वैशपायन मेडी. कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. ऋत्विक जयकर, जिल्हा कृषी अधिक्षक शुक्राचार्य भोसले, सह. संस्थांचे सहा. निबंधक आबासाहेब गावडे व उमेश पवार, विज वितरणचे कार्यकारी अभियंता राजकुमार पाटील, मनोरमा को-ऑप. बँकेचे चेअरमन श्रीकांत मोरे, बँकेचे मार्गदर्शक तथा श्री सिध्देश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीपरावजी माने, ए.जी.पाटील शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष सिध्दू पाटील व इंडियन मॉडेल स्कूलचे सचिव अमोल जोशी या मान्यवरांना आमंत्रित केले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून या सुरेल कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी बँकेचे सभासद, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक, शहरातील नागरीकांनी सहपरिवार उपस्थित रहावे असे आवहान बँकेचे वतीने करण्यात आले.या पत्रकार परिषदेस चेअरमन सोमनाथ गायकवाड, संचालक सचिन चौधरी, गंगाधर बिराजदार, तानाजी सिनगारे, शावरप्पा वाघमारे, बँकेचे व्यवस्थापक विनोद कुलकर्णी, प्रशासकीय अधिकारी सुनिल माळवदकर, चंद्रकांत म्हेत्रे, शाम पाटील आदी उपस्थित होते.
ब्रह्मदेवदादा माने सहकारी बँकेच्या वतीने सुवर्ण महोत्सवानिमित्त "दिवाळी पहाट गाण्याचे"आयोजन
byदैनिक लोकशाही मतदार
-
Tags
सोलापूर
