सोलापूर (प्रतिनिधी)-अखिल भारतीय प्रबुद्ध नाट्य परिषदेच्या विद्यमाने दिला जाणारा प्रतिष्ठेचा समाजाला जाणारा राज्यस्तरीय प्रबुद्ध पुरस्कार वितरण सोहळा राज्यातील संस्कृती व सामाजिक क्षेत्रातील कार्य करणाऱ्या आठ कलावंतांना मातोश्री कलावती धर्मा गायकवाड यांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले.महात्मा जोतिराव फुले यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून प्रबुद्ध रंगभूमी सोलापूर आयोजित सत्यशोधक जोतिबा फुले फेस्टीव्हल डॉ.फडकुले सभागृहात उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला फेस्टिव्हलचे उद्घाटन सिने अभिनेते भीमपुत्र टेक्सास गायकवाड यांच्या हस्ते झाले पँथर नेते अंबादास शिंदे होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत संयोजक डॉ. की lर्तिपाल गायकवाड यांनी प्रबुद्ध सांस्कृतिक चळवळीच्या कार्याच्या आढावा घेतला म.फुलंच्या अर्धपुतळ्यास डॉ.नसीमा पठाण व सुशीला वनसाळे यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आले तर दीप प्रज्वलन टेक्सास गायकवाड योगिराज वाघमारे प्रमोद लांडगे यशवंत पवार सिने अभिनेते प्रमोद सरवदे यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या सुरवातीस प्रा.शंकर खळसोडे प्रा.जीवन शिंदे आणि सहकारी कलावंतानी जोतिबा फुल्यांचा पोवाडा व सत्यशोधक गीते करून सादर्बकरून प्रेक्षकांची दाद मिळवली या फेस्टीव्हलमध्ये डॉ. संजय लांडगे(कविता वाचन),प्रा.प्रियांका सितासावद(सावित्री माईंच्या कविता), कल्याण श्रवस्ती (आंबेडकरांच्या भूमिकेत एकपात्री प्रबुद्ध नाट्य), संजय सायरे हे सुगत महाबोधी महाविहारका हिंदी नाटय,तर अभिनेत्री डॉ.श्रद्धा सन्मडिकर यांनी मी सावित्रीमाई फुले बोलता हा नाट्यप्रयोग सादर करून प्रेक्षकांची माने जिंकून घेतली.
यावेळी टेक्सास गायकवाड प्रबुद्ध साठे व इतर मान्यवरांच्या हस्ते क्रांतीसुर्य जोतिबा फुले व एकच स्वप्न प्रबुद्ध भारत या ग्रंथाचे आणि बुद्धिष्ट थेटर या धम्म विशेषांक प्रकाशन करण्यात आले.या समारंभात स्मृतीशेष भीमशाहीर संदीप शिंदे (मरणोत्तर),प्रबुद्ध गायक पुरस्कार भानुदा जीवणे (प्रबुद्ध नाटककार पुरस्कार), राजीव शिंदे(प्रबुद्ध ग्रंथकार पुरस्कार), प्रा. प्रियंका सितासावद (प्रवुद्ध अभिनेत्री पुरस्कार), राहुल खांडेकर(प्रबुद्ध पत्रकार पुरस्कार),प्रबुद्ध साठे(प्रबुद्ध नायक पुरस्कार), ॲड.बाबा वानखडे (बॅरिस्ट आंबेडकर विधीज्ञ पुरस्कार), अनंतकुमार सरवदे(प्रबुद्ध दिग्दर्शक पुरस्कार) आदी पुरस्काराने कलावंतांना स्मृतिचिन्ह सन्मानपत्र व पंचशील अभूषणाने देऊन सन्मानित करण्यात आले.टेक्सास गायकवाड व प्रबुद्ध साठे यांनी आपल्या भाषणात कलावंत व कार्यकर्त्यांनी प्रबुद्ध भारताच्या निर्मितीसाठी कार्य करावे असे आवाहन केले.यावेळी प्रवर्तक टेक्सास गायकवाड यांचा दैनिक लोकशाही मतदार,प्रबुद्ध नाट्य परिषदे,धम्मभुमी महिला संघ,छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड, प्रबुद्ध साहित्य परिषदच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याण श्रावस्ती आणि दर्शना चक्रवर्ती यांनी केले.कार्यक्रमास पत्रकार अक्षय बबलाद डॉ.अविनाश घोरपडे डॉ. अंगद मुके शिवपुत्र घटकांबळे प्रा विजया महाजन प्रा.क्षितिजा गायकवाड सिने अभिनेत्री मंगल नागमोडे प्रबुद्ध नाट्य परिषदेचे शहर अध्यक्ष मारुती बेल भंडारे व जिल्हाध्यक्ष रामजी गायकवाड वैशाली उबाळे रोहिणी वाघमारे प्रा.मोहन भालेराव अरुण कडलक प्रबुद्ध साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष यु.एफ.जानराव शक्य संघाचे अशोक दिलपाक अभिनेते आशुतोष नाटकर सिद्धार्थ भडकुंबे यांच्यासह कलावंत साहित्यिक विचारवंत मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते
