सोलापूर (प्रतिनिधी)- गेल्या आठ वर्षांपासून पत्रकार सुरक्षा समिती राज्यातील पत्रकारांसाठी वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन उपोषण निवेदन व राज्य सरकारकडे पत्र व्यवहार करून पाठपुरावा करत असून पत्रकार सुरक्षा समिती च्या माध्यमातून जेष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना आरोग्य योजना विमा योजना पत्रकारांसाठी घरकुल योजना ग्रामीण भागातील पत्रकारांना एसटी बसमधून मोफत प्रवास पत्रकारांच्या चारचाकी वाहनास टोल मधून सूट राज्यातील युट्युब व पोर्टल ला शासकीय जाहिराती यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्राना पूर्वी प्रमाणे जाहिराती खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल प्रकरणी वरिष्ठ अधिकारी मार्फत स्वतंत्र चौकशी पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण या सह राज्यातील पत्रकारांच्या विविध विषयावर पत्रकार सुरक्षा समिती आक्रमक व प्रभावीपणे काम करत असून पत्रकार सुरक्षा समितीच्या पत्रकार बांधवांना वेगवेगळ्या पदावर काम करण्यात यावे म्हणून पत्रकार सुरक्षा समिती दर वर्षी बरखास्त करून नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येते पत्रकार सुरक्षा समितीची 2025 ची कार्यकारणी बरखास्त करत असून लवकरच पत्रकार सुरक्षा समिती 2026 ची नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार सुरक्षा समितीचे कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे यांनी दिली आहे. तसेच राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी पत्रकारांनी एकत्र येण्याचे आवाहन देखील रामचंद्र सरवदे यांनी केलं आहे यावेळी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार महाराष्ट्र पोलीस वार्ता चे संपादक अमोल कुलकर्णी उपस्थित होते.
पत्रकार सुरक्षा समिती कार्यकारणी बरखास्त लवकरच नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी ; रामचंद्र सरवदे यांची माहिती
byदैनिक लोकशाही मतदार
-
Tags
सोलापूर
.jpg)
.jpg)