सोलापूर (प्रतिनिधी) गेल्या आठ वर्षांपासून पत्रकार सुरक्षा समिती राज्यातील पत्रकारांसाठी वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन उपोषण निवेदन व राज्य सरकारकडे पत्र व्यवहार करून पाठपुरावा करत असून पत्रकार सुरक्षा समिती च्या माध्यमातून जेष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना आरोग्य योजना विमा योजना पत्रकारांसाठी घरकुल योजना ग्रामीण भागातील पत्रकारांना एसटी बसमधून मोफत प्रवास पत्रकारांच्या चारचाकी वाहनास टोल मधून सूट राज्यातील युट्युब व पोर्टल ला शासकीय जाहिराती यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्राना पूर्वी प्रमाणे जाहिराती खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल प्रकरणी वरिष्ठ अधिकारी मार्फत स्वतंत्र चौकशी पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण या सह राज्यातील पत्रकारांच्या विविध विषयावर पत्रकार सुरक्षा समिती आक्रमक व प्रभावीपणे काम करत असून पत्रकार सुरक्षा समितीच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी साप्ताहिक कार्यसम्राट वृत्तपत्राचे
जेष्ठ पत्रकार कलीम शेख यांची नियुक्ती केली असून 6जानेवारी (पत्रकार दिनी ) त्यांचा ओळख पत्र नियुक्ती पत्र शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार करणार असल्याची माहिती पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे पश्चिम महाराष्ट्र संघटक मिर्झा गालिब मुजावर सोलापूर जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे यांनी दिली आहे
जेष्ठ पत्रकार कलीम शेख यांचा अल्प परिचय-
ज्येष्ठ पत्रकार कलीम शेख हे साप्ताहिक कार्यसम्राट वृत्तपत्राचे सोलापूर शहर प्रतिनिधी म्हणून अनेक वर्षांपासून काम पहात असून ते पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून अतिशय चांगल्या रीतीने जबाबदारी पार पाडली आहे पत्रकार सुरक्षा समितीच्या आंदोलन उपोषण निवेदनात त्यांनी भाग घेतला असून त्यांच्या या कार्याची दखल घेत पत्रकार सुरक्षा समितीने त्यांची पदोन्नती करून त्यांना पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष ही जबाबदारी दिली आहे जेष्ठ पत्रकार कलीम शेख यांची पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी वर्णी लागल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे
Tags
सोलापूर