डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित परिवर्तन समूह बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन



सोलापूर (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या महान कार्याची, विचारांची आणि समाजपरिवर्तनातील योगदानाची कृतज्ञतापूर्वक आठवण ठेवत 'परिवर्तन समूह बहुउद्‌देशीय संस्था सोलापूर तर्फे विशेष सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. समाजसेवा आणि मानवतेच्या मूल्यांना प्राधान्य देणाऱ्या या दिवशी रक्तदान शिबिराचे आयोजन केले असून हे शिबिर छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय रक्तपेढीच्या (सिव्हिल हॉस्पिटल). सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येत आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समतेचे, बंधुत्वाचे आणि मानवतेचे ज्योतिपर्व जगभर पसरवले. त्यांच्या कार्याचा सन्मान आणि समाजाला मदत करण्याच्या उ‌द्देशाने 'रक्तदान ही मानवतेची खरी सेवा या भावनेने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. आजच्या काळात रक्ताची उपलब्धता अनेक रुग्णांच्या जीवासाठी अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. त्यामुळे या शिबिरातून अधिकाधिक रक्त जमा होऊन गरजू रुग्णांना मदत होणे हा प्रमुख हेतू आहे.सदरील रक्तदान शिबिर दिनांकः ६ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी 8:00 ते सायकाळ 8:00 पर्यंत स्थळः 'हुतात्मा स्मृती मंदिर पार्किंग परिसर, सोलापूर येथे होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आले आहे या पत्रकार परिषदेस परिवर्तन समूह संस्थेचे सचिव अमृता अकलुजकर जगदीश बिडकर भारत अकलुजकर सह संस्थेचे अन्य पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.


Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form