सोलापूर (प्रतिनिधी)- व सोलापूरात नॉर्थ कोट येथे महापालिका निवडणूक संदर्भात फॉर्म भरण्यासाठी आज मंगळवार शेवटचा दिवस होता त्यामध्ये विविध पक्षांनी फर्म भरले त्यानंतर भाजप व शिंदे सेना यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता , अर्धा तास आधी भाजपा बी फॉर्म देणार असल्याचे जाहीर केल्यानंतर शहर अध्यक्ष रोहिणी तडवळकर आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी आल्यानंतर भाजपचे बी फर्म घेण्यास सुरवात झाले शेवटच्या १० मिनिट राहिल्याची घोषणा झाल्यानंतर मोठी धावपळ दिसून आली , यातच अनेक पक्षांच्यावतीने 3 वाजल्या नंतर देखील भाजपचे बी फॉर्म स्वीकारले जात असल्याचे आरोप झाले नंतर हा आरोप निदर्शने आणि ठिय्या आंदोलनाचे स्वरूप घेतले , मोठ्या प्रमाणात या आंदोलनाने तीव्र रूप धारण केले मोठ मोठ्या आवाजात घोषणाबाजी देण्यात आले, अन्याय झाल्याचं आरोप करण्यात आलं .दरम्यान घटनास्थळी आंदोलन स्थळी महापालिकेचे आयुक्त ओंबासे पोलिस आयुक्त एम राजकुमार हे येऊन आंदोलन करत्यांची मनधरणी करून समजावण्याचे प्रयत्न केले त्यानंतर देखील आंदोलन करते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले यादरम्यान आरोप प्रत्यारोप नंतर सदरील आंदोलन शमविण्यात प्रशासनाला कमालीचे अपयश आल्याचे चित्र दिसून आले.गोंधळ मात्र प्रचंड मोठा होता यामध्ये विरोधी पक्षासह सत्ताधारी पक्ष शिंदे सेना राष्ट्रवादी ही देखील सामील होते यामध्ये अशोक निंबर्गी मनसेचे महेश इंगळे चेतन नरोटे शिंदे सेनेचे अमोल शिंदे उबाठा चे अजय दासरी रफिक शेख सह अन्य कार्यकर्ते यांनी ठिय्या आंदोलनास बसले आहेत.
तीन वाजल्यानंतर देखील भाजपचा बी फॉर्म स्वीकारत असल्याचा आरोप आणि प्रचंड गोंधळ ; सत्ताधारीसह विरोधी पक्षांची निदर्शने आणि ठिय्या
byदैनिक लोकशाही मतदार
-
Tags
सोलापूर
