बंजारा समाजातून उगवता नेतृत्व ; महेश पवार यांची ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्या शहराध्यक्षपदी निवड



सोलापूर (प्रतिनिधी)- सामाजिक कार्य आणि समाजसेवेचा ध्यास घेऊन जनतेसाठी समाजासाठी दिवस रात्र लढणारा व्यक्तिमत्त्व म्हणून बंजारा समाजात तथा वंचित पीडित अन्यायग्रस्तांचा मसिहा अशी ख्याती निर्माण झालेले महेश पवार उर्फ (आण्णा) यांची नुकतीच ऑल इंडिया बंजारा समाज सेवा संघाच्या सोलापूर शहर अध्यक्षपदी निवड झाली असून रविवारी पार पडलेल्या भव्य बंजारा समाज मेळाव्यात महेश पवार यांना नियुक्तीपत्र शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार सन्मान करण्यात आले.याप्रसंगी वंचित पीडित अन्यायग्रस्त घटकांसोबत माझ्या बंजारा समाजासाठी अहोरात्र संघर्ष करेन जिथे अन्याय होईल तिथे महेशआण्णा पवार खंबीरपणे उभे राहतील अशी भावना नियुक्तीनंतर दैनिक लोकशाही मतदारशी बोलताना पवार यांनी व्यक्त केले. भविष्यात युवकांसाठी काम करण्याचा मानस - बंजारा समाजात युवक वर्ग अधिकारी, उच्चशिक्षित कसा होईल शिक्षणाकडे आमचा युवकवर्ग कसा वळेल युवकांना व्यसनाधिनतेपासून कश्यापद्धतीने दूर करता येईल आणि परिवर्तनवादी मार्गावर नेण्याच्या आणि समाजात काहीतरी चांगले वेगळे घडविण्यासाठी युवक वर्गाचा मोठा मोलाचा वाटा असणार आहे या युवक वर्गासाठी मी विशेष काम करण्याचा मानस असल्याचे पवार यांनी बोलून दाखविले.तर माझ्यावर ऑल इंडिया बंजारा सेवा संघाने जी शहर अध्यक्षपदाची जबाबदारी टाकली आहे त्या पदाला मी योग्य पद्धतीने न्याय देण्याचा प्रयत्न करेन शक्य होईल तितके माझा योगदान देईन आणि समाजासाठी गोरगरिबांसाठी कायम संघर्ष करत राहीन असे ठाम आश्वासन समाजातील सहकारी वर्गाला दिला असल्याचा महेश पवार यांनी दैनिक लोकशाही मतदारशी बोलताना सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form