सोलापूर जिल्ह्यात २८ फेब्रुवारी रोजी महा विधी सेवा शिबीराचे आयोजन


सोलापूर (प्रतिनिधी)- मुंबई उच्च न्यायालय तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या सुचनेनुसार आणि प्रमुख जिल्हा न्यायाधीश मनोज शर्मा यांच्या निर्देशानुसार सोलापूर जिल्ह्यात दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी महा विधी सेवा शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे.या शिबिरास सोलापूर न्यायिक जिल्ह्याचे पालक न्यायमुर्ती एन. जे. जमादार (मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ कोल्हापूर) तसेच न्यायमुर्ती फिरदोश पुनीवाला (मुंबई उच्च न्यायालय) उपस्थित राहणार आहेत.  

शिबिराचे उद्दिष्ट-शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांविषयी समाजात जागरुकता निर्माण करणे,कल्याणकारी कायद्यांबाबत जनजागृती करणे,पात्र लाभार्थ्यांना योजनांशी जोडणे व त्यांची कायदेशीर गरज समजून घेणे,योग्य कायदेशीर सल्ला देऊन समस्या सोडविणे  

शिबिरातील प्रमुख विषय-श्रमिक/मजूर कल्याण,दिव्यांग व्यक्तींचे प्रश्न,बालकांशी निगडीत मुद्दे,ट्रान्सजेंडर समुदाय,कारागृहातील कैदी,अनुसूचित जाती व जमाती,जेष्ठ नागरिक,भिकारी व बेघर व्यक्ती,रस्ता सुरक्षा व अपघात,नैसर्गिक आपत्तीग्रस्त,तस्करीचे पिडीत सदरील शिबीर जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने आयोजित करण्यात येणार असून जास्तीत जास्त शासकीय कार्यालयांनी सहभाग नोंदविणे आवश्यक आहे. शिबीर यशस्वी होण्यासाठी सर्व विभागांचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, सचिव प्रशांत पेठकर यांनी पत्राद्वारे कळविले आहे.  

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form