अल्पवयीन मुली सोबत विवाह करुन तिच्या इच्छे विरुध्द शारिरीक सबंध ठेवल्याप्रकरणी आरोपीस जामीन मंजूर

 


सोलापूर (प्रतिनिधी)-मोहोळ येथे राहणारी अल्पवयीन पिडीतेच्या फिर्यादी वरुन दिनांक ३०/०४/२०२३ रोजी आरोपी सोबत विवाह करुन घे, जर लग्न केले नाही तर तुझ्या आईस ठार मारेन त्यामुळे पिडीतेने मना विरुध्द लग्न केले. लग्नानंतर पिडीतेच्या मनाविरुध्द दिनांक ३०/०४/२०२३ ते २६/०९/२०२५ पर्यत जबरदस्तीने शारिरीक सबंध ठेवले व लग्नानंतरही मूल होत नसल्याने आरोपीचे भावा बरोबर शारिरीक सबंध ठेव असे बोलून मनास लज्जा उत्पन्न होईल अशी वागणुक पिडीतेस दिल्याने पिडीतेने मोहोळ पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केलेली आहे.त्यानंतर आरोपी शाहीद शेख याला अटक करुन न्यायालयात हजर केले. त्यानंतर आरोपीनी सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन मिळणेकरीता जामीन अर्ज दाखल केला होता. आरोपीच्या वकीलांनी युक्तीवादावेळी तपास पूर्ण झालेला आहे व आरोपी हा सोलापूर जिल्हयातील कायमचा रहिवाशी आहे व आरोपीच्या लग्नावेळी आरोपीचे देखील वय पूर्ण झाले नव्हते असा युक्तीवाद केला. सदरचा युक्तीवाद ग्राहय धरुन जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.एन. सुरवसे साो. यांनी आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केला.यात आरोपी तर्फे ॲड.अमोल स्वामी, ॲड.संतोष राठोड, ॲड.साबीर खरादी, ॲड.ताजोद्दीन कडेचूर व सरकार पक्षातर्फे ॲड.बागल यांनी काम पाहिले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form