सोलापूर गुन्हे शाखा अरविंद माने यांच्या पथकाची धडाकेबाज कारवाई;अग्निशस्त्र विक्रीसाठी आलेले तिघे जेरबंद, २ पिस्टल व ८ काडतुसे जप्त



सोलापूर (प्रतिनिधी)- महानगरपालिका निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सोलापूर शहर गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. अवैध अग्निशस्त्र विक्रीसाठी सोलापूरमध्ये आलेल्या तिघांना अटक करून त्यांच्याकडून ०२ देशी बनावटीची पिस्टल, ०८ जिवंत काडतुसे व मोटारसायकल असा एकूण २ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी निवडणूक काळात अवैध शस्त्रांच्या वापरातून होणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखेला विशेष मोहिम राबवण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार सतर्क असून गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी गुन्हे शाखेतील पोहवा संताजी रोकडे व पो.कॉ. भारत पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, डी.आर.एम. रेल्वे ऑफिसजवळील रेल्वे कॉलनीच्या वॉल कंपाऊंडलगत मोकळ्या जागेत तीन इसम देशी बनावटीची पिस्टल विक्रीच्या उद्देशाने थांबले आहेत. ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांना देण्यात आली.वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे व त्यांच्या तपास पथकाने तत्काळ सदर ठिकाणी सापळा रचला. तेथे काळ्या रंगाच्या होंडा युनिकॉर्न मोटारसायकलवर तीन इसम संशयास्पद अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी शिताफीने तिघांना ताब्यात घेतले.ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावेव १) महंमदरफिक लालसाब जातगर ऊर्फ मनगोळी (वय २६, रा. अलमेल, जि. विजापूर, कर्नाटक),२) राजा नुरजानसाब सौदागर (वय २६, रा. अलमेल, जि. विजापूर, कर्नाटक) ३) प्रदीप सुर्यकांत काळभोर (वय ३५, रा. लोणी काळभोर, पुणे) अशी आहेत.पंचासमक्ष अंगझडतीदरम्यान राजा सौदागर व प्रदीप काळभोर यांच्या कंबरेत खोचलेली प्रत्येकी एक देशी बनावटीची पिस्टल तसेच एकूण ०८ जिवंत काडतुसे आढळून आली. चौकशीत आरोपींकडे कोणताही शस्त्र परवाना नसल्याचे निष्पन्न झाले असून सदर अग्निशस्त्रे विक्रीसाठी सोलापूरमध्ये आल्याची कबुली त्यांनी दिली.या प्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर २७/२०२६ भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही संपूर्ण कारवाई एम. राजकुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर, डॉ. अश्विनी पाटील, उप-आयुक्त पोलीस (गुन्हे/विशेष शाखा), श्री. राजन माने, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, स.पो.नि. दत्तात्रय काळे व त्यांच्या तपास पथकातील संताजी रोकडे अनिल जाधव महेश शिंदे भारत पाटील कुमार शेळके राजू मुदगल महेश पाटील महेश रोकडे अंकुश भोसले सुभाष मुंडे सिद्धाराम देशमुख राजेश मोरे अजय गुंड सायबर पो स्टे कधील प्रकाश गायकवाड मच्छिन्द्र राठोड सतीश काटे बाळू काळे पोलीस अंमलदारांनी यशस्वीपणे पार पाडली.निवडणूक काळात अशा प्रकारच्या अवैध शस्त्रविक्रीवर आळा घालण्यासाठी पोलिसांची धडक कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा गुन्हे शाखेचे सिंघम वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी दिला आहे.



Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form