राज्यातील बौद्ध समाजातील संस्थांना पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी सन २०२५-२६ अनुदान योजना जाहिर



सोलापूर (प्रतिनिधी)- राज्यातील धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या व संस्थेमध्ये ५१ टक्के पेक्षा जास्त बौद्ध समाजातील विश्वस्त/सदस्यांची संख्या असलेल्या बौद्ध समाजातील सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक कार्य राबविणाऱ्या संस्थांना पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना सन २०२५-२६ अंतर्गत प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र संस्थांनी सन २०२५-२६ साठीचे परिपूर्ण प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय (नियोजन शाखा), सोलापूर यांचेकडे दि. २० फेब्रुवारी २०२६ पूर्वी सादर करावेत.दि. २० फेब्रुवारी २०२६ नंतर प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांचा विचार केला जाणार नाही, असे जिल्हा नियोजन अधिकारी, सोलापूर तथा जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी, दिलीप पवार यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post