अधिकारी आणि उच्च शिक्षित परिवार घडविणारे ॲड.संजीव सदाफुले : चिरंजीव शुभम अधिकारी झाल्याने मन गहिवरले

 


सोलापूर (प्रतिनिधी)- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीचे प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना नेहमी यश मिळत असते त्याच मूर्तिवंत उदाहरण म्हणजे ॲड.संजीव सदाफुले. ॲड सदाफुले हे गेल्या 45 वर्षांपासून अहोरात्र प्रयत्न करून आपल्या जीवनातील विद्यार्थी दशेपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मिशन पुढे घेऊन जाण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत असतात, स्वतःच्या कष्टाची कमाई अहोरात्र मेहनत करून आंबेडकरी चळवळीसाठी वाहून देणारे मूर्तिवंत उदाहरण म्हणजे ॲड.संजीव सदाफुले यांचे निस्वार्थी आंबेडकरी चळवळीमधील कार्य त्यांचे वडिल सिद्राम सदाफुले यांच्या मृत्युपशात अनुकंपा तत्वावर सोलापूर महानगरपालिकेत मिळणारी नोकरी ॲड.सदाफुले यांनी आपल्या शिक्षणाच्या व विध्वतेच्या जोरावर, वकील होऊन केवळ सहा महिने झालेले असताना आपल्या कुटुंबाची परिस्थिती नाजूक असताना सुद्धा सोलापूर महानगरपालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याची नोकरी नाकारली आणि आपल्या कष्टाच्या जोरावर संपूर्ण कुटुंब चार-पत्र्याच्या खोलीमधून अहोरात्र मेहनत करून आज मोठ्या बंगल्यामध्ये वास्तव्यास आणले.केवळ ॲड.सदाफुले यांच्या कष्टामुळे आज हे सर्व सोन्याहून पिवळे असलेलं ऐश्वर्य संपूर्ण कुटुंब बघत आहे.यातच त्यांच्या कष्टाचे फळ म्हणून ताजे उदाहरण म्हणजे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये शुभम संजीव सदाफुले हा महाराष्ट्र मधून एसी कॅटेगिरी अंतर्गत दोन नंबरचा रँक प्राप्त करून सुपर क्लास वन अधिकारी / महाराष्ट्र कृषी संचालक आज बनला आहे.शिक्षणासाठी संजीव सदाफुले यांनी आपल्या जीवन आणि होईल तेवढी मेहनत पणाला लावून शुभमला सक्षम बनवले व शुभमने आपल्या वडिलांच्या कष्टाचे चीज करून दाखवून मोठी नोकरी मिळवून वडिलांचे नाव मोठे करून दाखवले.खऱ्या अर्थाने हेम्हणण्यास वावगे ठरणार नाही की, आंबेडकरी चळवळीमध्ये प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या कुटुंबाचे भले झाल्याशिवाय राहत नाही.त्याचे मूर्तिवंत उदाहरण म्हणजे सोलापुरातील नामांकित तथा वरिष्ठ वकील ॲड.संजीव सदाफुले परिवार आहे. यादरम्यान दैनिक लोकशाही मतदारशी बोलताना ॲड.संजीव सदाफुले यांनी माझ्या कुटुंबाने आमची सुरवातीची बिकट परिस्थिती लक्षात घेता माझ्या सर्व मुलांनी दिवस रात्र कष्ट घेऊन अभ्यास करून डॉ.बाबासाहेबांनी सांगितलेल्या सत्कर्माच्या मार्गावर चालत आज सदाफुले कुटुंबाचे मान संपूर्ण महाराष्ट्रात उंचवले असून माझ्या चळवळीप्रती असलेली प्रामाणिकता आणि प्रेम याची आज मला शुभम आणि सर्व माझ्या मुलांच्या माध्यमातून पोचपावती मिळाली असे भावना व्यक्त करत ॲड.संजीव सदाफुले यांचे मन गहिवरून आले.माझ्या सर्व कुटुंबावर आणि मुलांवर सार्थ अभिमान असल्याचेही ॲड.सदाफुले यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post