मंद्रूप हद्दीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट; नागरिकांत संताप : सविस्तर वृत्त लवकरच


मंद्रूप (ता. दक्षिण सोलापूर)- मंद्रूप हद्दीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट वाढल्याची चर्चा परिसरात रंगू लागली आहे. मटका, जुगार, अवैध दारू विक्री आणि इतर बेकायदेशीर व्यवहार खुलेआम सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.स्थानिकांच्या मते, काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत संशयास्पद हालचाली सुरू असतात. तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत असून, त्यामुळे कुटुंबांवर आर्थिक आणि सामाजिक ताण वाढत आहे. “अवैध धंद्यांमुळे परिसरातील वातावरण बिघडत आहे. यामुळे अवैध धंदे बंद व्हावे अशी मागणी सध्या मंद्रूप गावात जोर धरून आहे.मात्र, ठोस आणि सातत्यपूर्ण कारवाई होत नसल्याची खंत व्यक्त होत आहे. पोलीसांनी गस्त वाढवून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच या प्रकारांना आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी जोर धरत आहे.याबाबत सविस्तर वृत्त लवकरच दैनिक लोकशाही मतदार मधे प्रसारित होईल.


Post a Comment

Previous Post Next Post