महापालिकेच्या शाळेत शिक्षकांच्या तोंडी बदल्यांवरून संताप — चौकशीची मागणी तीव्र

 


सोलापूर- सोलापूर महानगरपालिका अंतर्गत उर्दू व मराठी प्राथमिक शाळांमध्ये सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर तोंडी शिक्षक बदल्या, पदांचा दुरुपयोग व मनमानी कारभाराच्या निषेधार्थ भ्रष्टाचार विरोधी मंचच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद पुनम गेट येथे तीव्र निदर्शने व घोषणाबाजी करण्यात आली.या वेळी मंचाच्या वतीने महापालिका आयुक्त यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले असून संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबन व खातेनिहाय चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

निदर्शनामागील प्रमुख मुद्दे :

पाच नंबर उर्दू मुलींच्या शाळेत तोंडी आदेशावर अतिरिक्त शिक्षक कार्यरत असल्याचा आरोप.विषयाशी विसंगत बदली — विज्ञान विषयाची जागा रिक्त असताना समाजशास्त्र शिक्षकाची नियुक्ती.काही शाळांमध्ये तोंडी आदेशावर शिक्षकांची नेमणूक झाल्याचा संशय.वरिष्ठतेचा नियम व शासन निर्णय डावलून मनमानी बदली प्रक्रिया.संबंधित प्रशासन अधिकाऱ्यांचे कथित अपमानास्पद वक्तव्य व संघटनेला गुन्हा दाखल करण्याची धमकी.

नागरिकांच्या लेखी निवेदनांवर वेळेत उत्तर न देणे व व्हॉट्सअॅपद्वारे उडवाउडवीची उत्तरे.

कायदेशीर बाबींचा उल्लेख :महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियमांचे उल्लंघन

पदाचा दुरुपयोग — Prevention of Corruption Act अंतर्गत चौकशीची मागणी शासकीय कामकाजातील पारदर्शकतेचा अभाव प्रशासकीय कर्तव्यच्युती

प्रमुख मागण्या - संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी समिती नेमावी.संबंधित प्रशासन अधिकाऱ्यावर तात्काळ खातेनिहाय चौकशी व निलंबनाची कारवाई करावी.अनधिकृत बदली आदेशांची चौकशी करून जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंग कारवाई करावी.भविष्यात सर्व बदल्या केवळ लेखी आदेशाने व शासन नियमांनुसारच कराव्यात.निदर्शनावेळी भ्रष्टाचार विरोधी मंचचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी “शिक्षण विभागातील मनमानी बंद करा”, “तोंडी बदल्या रद्द करा”, “जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा” अशा घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधले.

भ्रष्टाचार विरोधी मंचने स्पष्ट केले की, शिक्षण विभागातील कोणतीही अनियमितता सहन केली जाणार नाही आणि निष्पक्ष चौकशी होईपर्यंत लढा सुरू राहील.

Post a Comment

Previous Post Next Post