सोलापूर(प्रतिनिधी)- सोलापूर, दि. २३ मार्च २०२६ : जागतिक महिला दिनानिमित्त समाजात उल्लेखनीय, प्रेरणादायी व आदर्श कार्य करणाऱ्या महिलांच्या सन्मानासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनल तर्फे ‘नारी सन्मान व पुरस्कार सोहळा-२०२६’ चे आयोजन करण्यात आले होते. हा भव्य सोहळा डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह, सिद्धेश्वर मंदिराजवळ, सोलापूर येथे सोमवारी सायंकाळी ६.३० वाजता उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती नसीमा पठाण (ज्येष्ठिका, कवयित्री), ज्ञानेश्वरीताई देवकर (उपमहापौर, सोमपा. सोलापूर), प्रा.डॉ.अंजना अशोक गायकवाड,अॅड. सरिता मोकाशी (कार्यकारिणी सदस्य, सावित्री महिला संघटना), सेवानिवृत्त महिला पोलीस अधिकारी मीनाक्षी पेठे, समाजभूषण जानराव यू. एफ.-कुष्ठरोग तंत्रज्ञ तसेच यशवंत फडतरे (सामाजिक कार्यकर्ते) आदी मान्यवर उपस्थित होते.या सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते गौरव करण्यात आला. सन्मानित महिलांमध्ये आरती ज्योतिबा पारखे (समाजसेवा), प्रियांका शिरीष सितासावद (कलाकार),सुप्रिया शिरीष सितासावद (समाजसेवा),अश्विनी शिवानंद हत्तुरे (समाजसेवा),ग्रीष्मा विनायक साळुंके (समाजसेवा, सोलापूर),लक्ष्मी माळप्पा पुजारी (आदर्श सरपंच),सोनाली गायकवाड (स्वावलंबी महिला रिक्षाचालक), रेखा सुनिल बिनेकर (उद्योजिका, कलाकार),उमा श्रीपती देगीनाळ (समाजसेवा,),शुभांगी सचिन दर्गोपाटील (समाजसेवा), लक्ष्मी नागणसूरे (कलाकार), दिपाली आप्पासाहेब कदम (कृषीदूत, सोलापूर), प्रा.अनुराधा गंगूल (कलाकार, सोलापूर),सोनाली शास्त्री (वैद्यकीय सेवा, सोलापूर), उमा अकोलकर-माळी (समाजसेवा, माढी, उ. सोलापूर),चैताली प्रशांत क्षीरसागर (कलाकार), जोसेफिया मुर्शद (कलाकार),मीरा बुद्रुक -समाजसेवा,, संगीता क्षीरसागर समाजसेवा,पूजा सातारकर शिंदे (उद्योजिका/कलाकार)आणि नसीमा गफूर शेतसंदी (समाजसेवायांचा समावेश होता.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिद्धार्थ भडकुंबे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रांजली मोहीकर यांनी केले, तर स्नेहा सुतकर आणि आशा भडकुंबे यांनी आभार प्रदर्शन केले.यावेळी “नारीशक्ती सन्मान २०२६” निमित्त हिंदी व मराठी गाण्यांची सुरेल आणि रंगतदार मैफिलही सादर करण्यात आली. कार्यक्रमात उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त करत जनता संघर्ष न्यूज चॅनलच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाच्या आयोजनात प्रांजली मोहीकर, स्नेहा सुतकर आणि आशा भडकुंबे यांचे विशेष योगदान लाभले.
