सोलापूर (प्रतिनिधी)-आखाती युद्धच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त अश्विनी पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली आज सायंकाळी अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांच्या नेतृत्वासह सोलापुरातील विविध ठिकाणी पाथकाने धाडी मारल्या यावेळी पार्क चौक, जुळे सोलापूर,डी मार्ट, विजापूर रोड कंबर तलाव अशा चायनीज गाड्या व पावभाजी सेंटरवर धाडी टाकण्यात आल्या.यावेळी एकूण 41 घरगुती गॅस टाकी आढळून आले. रात्री उशिरापर्यंत विजापूर पोलीस स्टेशन सदर बाजार पोलीस स्टेशन जेल रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे कामकाज चालू होते.या पथकात परिमंडळ अधिकारी ब विभाग राजेश यमपुरे, परिमंडळ अधिकारी अ विभाग नंदकिशोर डोके परिमंडळ अधिकारी ड विभाग प्रफुल नाईक पुरवठा निरीक्षक ज्ञानेश्वर काशीद पुरवठा निरीक्षक सज्जन भोसले, वैभव मोरे, सचिन लांडे, आनंद मधणे तसेच पोलीस प्रशासनातून पोलीस अंमलदार जावेद जमादार आबाजी सावळे धीरज सातपुते विठ्ठल यलमार आदी उपस्थित होते.
जप्त करण्यात आलेल्या गॅस टाकींची पोलीस स्टेशन हद्द निहाय आकडेवारी
सादर बझार - 6
फोजदार चौडी - 19
विजापूर नाका - 16
एकूण - 41
