सोलापूर (प्रतिनिधी)-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरात त्रिदिवसीय प्रबोधन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक समता, न्याय आणि बंधुता या मूल्यांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून विविध मान्यवर वक्त्यांची उपस्थिती लाभणार आहे.या प्रवचनमालेचा ऐवजी प्रबोधन व्याख्यानमालेचा प्रारंभ शनिवार, 11 एप्रिल रोजी सायंकाळी 6.00 वाजता होणार असून प्रा. डॉ. लक्ष्मण ढोबळे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.पहिल्या पुष्पात “जातिविरहित समाजव्यवस्थेची संकल्पना : संत बसवण्णा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान” या विषयावर प्रा. शंकर पाटील मार्गदर्शन करणार असून अध्यक्षस्थानी प्राचार्य चंद्रकांत पांढरे असतील.रविवार, १२ एप्रिल रोजी दुसऱ्या पुष्पात “डॉ. आंबेडकरांच्या दृष्टिकोनातून संवैधानिक आरक्षण आणि न्यायालयाची भूमिका” या विषयावर प्रा. डॉ. विजय माकणीकर व्याख्यान देणार आहेत. या सत्राचे अध्यक्ष मा. निजामुद्दीन शेख असतील.सोमवार, १३ एप्रिल रोजी तिसऱ्या पुष्पात “आंबेडकरी चळवळ : ऐतिहासिक वाटचाल, सद्यस्थिती, आव्हाने व पर्याय” या विषयावर डॉ. हर्षवर्धन कोल्हापूरे मार्गदर्शन करणार असून अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. तानाजी देशमुख राहतील.सदर व्याख्यानमालेत समाजप्रबोधन, संविधानिक मूल्यांची जाणीव आणि विचारांचे आदानप्रदान यावर भर दिला जाणार आहे. या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Tags:
सोलापूर
