सोलापूरकरांनो पाणी जपून वापरा! आज शहराचा पाणीपुरवठा बंद; मुख्य जलवाहिनी फुटल्याने मनपाचा निर्णय

 


सोलापूर-शहरातील होटगी रोडवरील कल्याण नगर, आसरा पुलाजवळ पिण्याच्या पाण्याची मुख्य जलवाहिनी (Main Line) अचानक फुटल्याची घटना घडली आहे. या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम महानगरपालिकेकडून उद्या, शुक्रवार दिनांक १० एप्रिल रोजी हाती घेतले जाणार आहे. यामुळे सोलापूर शहराचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला असल्याची माहिती महानगरपालिका प्रशासनाने अधिकृत पत्राद्वारे दिली आहे.होटगी रोड परिसरातील आसरा पुलाजवळ असलेली मुख्य जलवाहिनी फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात होते. ही गळती थांबवण्यासाठी आणि पाईपलाईनच्या दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद ठेवणे अनिवार्य आहे. उद्या दिवसभर हे दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर चालणार आहे.ज्या भागाला आज पाणी मिळणार होते, त्यांचा पुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. दुरुस्तीनंतर शहराचा पाणीपुरवठा नियमित वेळापत्रकापेक्षा एक दिवस उशिराने (रिव्हर्स रोटेशनने) होणार आहे. महानगरपालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की, पाइपलाइन दुरुस्तीच्या कामामुळे होणाऱ्या या बदलाची नोंद घ्यावी आणि उपलब्ध पाण्याचा वापर जपून करावा.

Post a Comment

Previous Post Next Post