सोलापूर (प्रतिनिधी)-नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन, अर्थात "निमा" या इंटिग्रेटेड मेडिकल प्रॅक्टिशनर यांच्या संघटनेचा 78 वा स्थापना दिवस दिनांक 13 एप्रिल रोजी असून यंदा निमा सोलापूर शाखेकडून विविध उपक्रमांनी हा दिवस साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये आरोग्य शिबिर, वृक्षारोपण यासोबत वैद्यकीय क्षेत्रात व संघटनेमध्ये दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या डॉक्टरांचा निमाकडून विविध पुरस्कारांनी सन्मान करण्यात येणार आहे. अशी माहिती निमा पदाधिकारी यांनी आयोजित पत्रकार पत्रकार परिषदेमध्ये दिली.सोलापुरातील इंटिग्रेटेड डॉक्टरांच्या हक्कासंबंधी व प्रश्नांबाबत निमा सोलापूर शाखेकडून विविध स्तरावरून प्रयत्न केले जात असतात. त्याचसोबत इतर सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रम व प्रबोधनपर व्याख्याने ही आयोजित केली जातात. यामुळे निमा सोलापूर शाखेला नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये "बेस्ट ब्रांच अवॉर्ड" सह विविध पारितोषके देऊन सन्मानित करण्यात आले आहे.निमा स्थापना दिनाच्या औचित्यावर रविवार दिनांक 12 एप्रिल रोजी डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह, सोलापूर सायंकाळी 6 वाजता वैद्यकीय क्षेत्रात व संघटनेत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या मध्यवर डॉक्टराना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येभार आहे. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूरचे महापौर विनायक कोंड्याल आणि प्रसिद्ध उद्योजिका डॉ. सुहासिनी यतिन शहा या उपस्थित राहणार आहेत.दिनांक 13 एप्रिल रोजी उळे तालुका दक्षिण सोलापूर येथे आरोग्य मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तसेच विडी घरकुल परिसरातील गरजू रुग्णांसाठी डॉ. जिड्डीमनी यांच्या कमल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून गरजू रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन निमा सोलापूचे अध्यक्ष डॉक्टर नागनाथ जिड्डीमनी यांनी केले आहे.या पत्रकार परिषदेस निमाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. विनायक टेंभुर्णीकर, डॉ. साहेबराव गायकवाड, डॉ. रविराज गायकवाड, डॉ. सुभाष भांगे, डॉ. नितीन बलदवा डॉ. नागनाथ जिड्डीमनी, डॉ. अभिजीत पुजारी, डॉ. प्रवीण ननवरे, डॉ. श्रुती मराठे, डॉ पल्लवी भांगे, डॉ अश्विनी देगांवकर, डॉ. राजश्री मठ, डॉ. वाले, डॉ. योगेश उडगीकर, डॉ. उत्कर्ष वैद्य इ. डॉक्टर्स उपस्थित होते.
पुरस्कार प्राप्त डॉक्टर्स -
1. धन्वंतरी पुरस्कार : डॉ. विजय आरकाल. (ऍलोपॅथी), वैद्य राघवेंद्र नादरगी, (आयुर्वेद)
2. निमारत्न पुरस्कार डॉ. धनंजय कुलकर्णी.
3. डॉ. अनिल पत्की स्मृती विशेष प्रस् ATED MEDICAL उस्कारः डॉ. माधव गंडेटीASS
4. निमा सुपरस्टार पुरस्कार डॉ. अमोल माळगे डॉ. अश्विनी देगांवकर,
5. निमा शायनिंग स्टार पुरस्कार डॉ. सचिन बोंगरगे डॉ. वैजनाथ स्वामी,IN C
6. निमा रायझिंग स्टार पुरस्कार डॉ. सुनील खट्टे आणि डॉ. आदिल मुल्ला,
7. निमा सोलापूर विशेष गौरव पुरस्कार - डॉ. राजलक्ष्मी गायकवार A N मंजिरी कुलकर्णी डॉ. विलास सरवदे
