सोलापूर- संत रोहिदास सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संघटनेच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा “संत रोहिदास जीवन गौरव पुरस्कार” देऊन सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल व्हनमारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.या मेळाव्यात डॉ. टी. डी. कांबळे, भागवत दळवी, अॅड. विठ्ठलराव अंगुले, सोपान थोरात आणि अशोक राजगुरू सर यांना संत रोहिदास जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करून समाजाला प्रेरणा देण्याचा उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.सदर कार्यक्रम दि. ३१ मे २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता हॉटेल सेंटर पॉइंट, सात रस्ता, सोलापूर येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्योतीताई वाघमारे (राज्यसभा सदस्य), माजी आमदार बाबुरावजी माने, ज्येष्ठ नेते सुधीरजी खरटमल, उद्योगपती निसार शेख, आदर्श शिक्षक बापुसाहेब अडसूळ उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. तसेच उद्योगजक शिवलाल हरळेकर, प्रल्हाद कांबळे आणि संजय धनशेट्टी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.या मेळाव्यात समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरवही करण्यात येणार असून, इयत्ता १० वी व १२ वीमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाणार आहे. तसेच पोलीस भरतीत यश मिळविलेल्या युवक-युवतींचा विशेष सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.याशिवाय, जिल्हा दक्षता समिती सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल मोहन गायकवाड यांचा सत्कार करण्यात येणार असून, नव्याने नगरसेविका म्हणून निवड झालेल्या सौ. सुमन चाबुकस्वार, सौ. श्रीदेवी फुलारे आणि संगीताताई जाधव यांचाही गौरव करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.या पत्रकार परिषदेस संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल (भाऊ) व्हनमारे, प्रदेश युवक अध्यक्ष हरिभाऊ वाघमारे, शहर अध्यक्ष बाळासाहेब सुरवसे, जिल्हाध्यक्ष प्रदीप घागरे, संपर्क प्रमुख रवि रांजणीकर आणि प्रदेश उपाध्यक्ष श्रीकांत कांबळे उपस्थित होते. समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले.
Tags:
सोलापूर
