विजापूर नाका हद्दीतून अवैध वाळू वाहतूक जोमात; प्रशासनाच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष ; वाळू माफियांना अभय कोणाचे? लवकरच सविस्तर वृत्त..


सोलापूर (प्रतिनिधी)- शहरातील विजापूर नाका पोलीस ठाणे हद्दीतून अवैध वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याची चर्चा सध्या परिसरात रंगत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी ट्रॅक्टर, डंपर व इतर वाहनांद्वारे वाळूची वाहतूक होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून संबंधित विभागाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, काही ठराविक मार्गांवरून नियमितपणे वाळू वाहतूक होत असून अनेकदा वाहनांची ये-जा रात्री उशिरापर्यंत सुरू असते. या वाहनांमुळे रस्त्यांवर धूळ उडणे, वाहतुकीचा अडथळा निर्माण होणे तसेच अपघाताचा धोका वाढत असल्याची तक्रार परिसरातील रहिवाशांनी व्यक्त केली आहे.अवैध वाळू उपसा व वाहतुकीमुळे शासनाच्या महसुलाचे मोठे नुकसान होत असल्याचेही बोलले जात आहे. महसूल विभाग, पोलीस प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी संयुक्त कारवाई करून अशा प्रकारांना आळा घालावा, अशी मागणी नागरिकांतून पुढे येत आहे.दरम्यान, विजापूर नाका हद्दीत सुरू असलेल्या कथित वाळू वाहतुकीबाबत संबंधित प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून लवकरच दैनिक लोकशाही मतदार मध्ये कोणत्या मार्गावरून वाळू तस्करी होत आहे वाळू माफियांचा सुळसुळाट कशा पद्धतीने चालू आहे याचे सविस्तर वृत्त लवकरच प्रकाशित होणार.

Post a Comment

Previous Post Next Post