पुणे विभागीय नाट्य स्पर्धेत सोलापूरच्या 'अस्तित्व मेकर फाऊंडेशन'चा गौरव; श्रावणी लोखंडे यांचा सन्मान


सोलापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित ६४ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा, २२ वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा आणि प्रथम महाराष्ट्र राज्य मराठी एकांकिका स्पर्धा (२०२५-२६) यांच्या प्राथमिक फेरीतील पारितोषिक विजेत्यांचा पुणे विभागीय पारितोषिक वितरण समारंभ मंगळवारी (दि. ३० जून) सायंकाळी ४.३० वाजता भरत नाट्य मंदिर, पुणे येथे पार पडणार आहे.या समारंभात सोलापूरच्या 'अस्तित्व मेकर फाऊंडेशन' या संस्थेच्या बालनाट्य विभागातील श्रावणी लोखंडे हिच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्मान करण्यात आला. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने प्रदान करण्यात आलेला हा सन्मान संस्थेसाठी आणि सोलापूरच्या सांस्कृतिक क्षेत्रासाठी अभिमानास्पद मानला जात आहे.अस्तित्व मेकर फाऊंडेशनने बालरंगभूमीच्या माध्यमातून मुलांमध्ये कलागुण, सर्जनशीलता आणि आत्मविश्वास विकसित करण्यासाठी सातत्याने कार्य केले आहे. श्रावणी लोखंडे हिच्या यशामुळे संस्थेच्या कार्याला नवी ओळख मिळाली असून, सोलापूरच्या नाट्य क्षेत्रातही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.या यशाबद्दल श्रावणी लोखंडे हिच्या वर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, भविष्यातही ती नाट्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post