बार्शी मध्ये काकाने दिली पुतण्याच्या हत्येची सुपारी सौरभ जाधव या युवकावर जीवघेणा हल्ला व दुकानाची तोडफोड

 बार्शी - बार्शी शहरात कायद्याचा भाग उरला आहे की नाही असा संतप्त सवाल निर्माण करणारी एक थरारक आणि अंगावर काटा आणणारी घटना उघडकीस आली आहे. रुबाब कलेक्शन शोरूम चे मालक सौरभ जाधव यांचे काका नवनाथ जाधव व जगन्नाथ जाधव या दोघांनी पुतण्या सौरभ जाधवला मारण्यासाठी शहरातील गुंडांना पाठवून त्याचा हत्येचा कट रचला. त्यानुसार दिनांक 20 जुलै रोजी भरदिवसा शहरातल्या गजबजलेल्या भागात कुर्डूवाडी रोड, जैन मंदिर लगत असलेल्या रुबाब कलेक्शन कापडाच्या दुकानात घुसून दहा ते बारा जण गुंडांच्या टोळक्यांनी रुबाब कलेक्शनचे मालक सौरभ जाधव यांच्यावर खंजीर व दगडाने सपासाप वार करत जीवघेणा हल्ला केला.
 सौरभ जाधव यांचे चुलते नवनाथ जाधव व जगन्नाथ जाधव यांनी जमिनीचा वाद मिटवण्यासाठी चक्क 10 ते 12 जणांच्या टोळक्यांना मारण्यासाठी पाठवून दिवसाढवळ्या दुकानातील काचा फोडून अक्षरशः धुमाकूळ घातला. या फिल्मी स्टाईल राड्यामुळे बार्शी शहरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. याप्रकरणी सौरभ वैजीनाथ जाधव (वय 28.राहणार पिंपळकर प्लॉट बार्शी) या गंभीर जखमी झालेल्या व्यावसायिकाने बार्शी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून सध्या त्याच्यावर जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
 पोलिसात दाखल झालेल्या एफआयनुसार सौरभ जाधव यांचे बार्शीत कुर्डूवाडी रोड,जैन मंदिर जवळ रुबाब कलेक्शन नावाचे दुकान आहे. सोमवार दिनांक 20 जुलै 2026 रोजी दुपारी 01.00 वाजेच्या सुमारास सौरभ हे दुकानात बसले असताना आरोपी भैया ढावारे हा त्याच्या सात ते आठ साथीदारासह तेथे धडकला त्याने खंजीर काढून सौरभ यास शिवीगाळ करत धमकावले तुझा चुलता नवा जाधवला रुबाब कलेक्शन येथील जागा देऊन टाक,आणि दुसरे काका जगन्नाथ जाधव यांची बायपास कडील जमिनीकडे तू लक्ष घालू नकोस, नाही तर तुला खल्लास करून टाकीन असे धमकी देत त्यांनी आम्हाला 01 लाख रुपये खंडणी देण्याची मागणी केली तसेच सौरभ याचे कॉलर पकडून त्यांना दुकानाबाहेर खेचत झटापट केले व ते तेथून निघून गेले एवढ्यावरच या गुंडांची मस्ती जिरली नाही तर दुपारी 03.30 वाजता च्या सुमारास हे गुंड अधिक तयारनिशी दुकानात घुसले यावेळी आरोपी मुन्ना बोते यांनी हातात खंजीर घेऊन आणि एका अनोळखी साथीदाराने दगड घेऊन दुकानात प्रवेश केला तुला आज जिवंत सोडणार नाही अशी डरकाळी फोडत त्या अनोळखी इसमाने सौरभ याच्या डोक्यात थेट दगड घातला तर मुन्ना बोते यांनी आपल्या हातातील खंजीराने सौरभच्या दोन्ही हातावर आणि डोक्यात सपासप वार करून त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पाडले. जाता जाता या टोळक्याने दुकानातील काउंटर आणि शोकेसच्या काचा फोडून दुकानाचे अतोनात नुकसान केले व परिसरात दहशत माजवत पोबारा केला.
 रक्तबंबाळू अवस्थेतील सौरभ जाधव यांना त्यांच्या नातेवाईकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले या घटनेची माहिती मिळताच बार्शी शहर पोलिसांनी 22 जुलै रोजी तातडीने दखल घेत आरोपीवर भारतीय न्याय संहिता (BNS 2023) च्या कलम 118(1), 308(3), 115(2),352, 351(2), 351(3),3 324(4), 190, 191(2),191(3) आणि 189(2)अशा तब्बल 11 गंभीर कलमान्वये (खंडणी, खुनाचा प्रयत्न, प्राणघातक हल्ला, दंगल घडवणे इत्यादी) गुन्हा FIR नंबर 0578/2026 दाखल केला आहे.
 या प्रकरणाचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल बालाजी हनुमंत घोळवे हे करत आहेत. भर वस्तीत सौरभ जाधव या व्यापारास खंजीर उगारून खंडणी मागितल्याने बार्शीतील व्यापारी वर्गात प्रचंड भीतीचे आणि संतापाचे वातावरण असून या घटनेला जबाबदार असणारे काका नवनाथ जाधव व जगन्नाथ जाधव व गुंडांच्या मुसक्या पोलीस कधी आवळणार याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post