पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील कर्मचारी यांना कायम करणेसाठी मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांची भेट

 

मुंबई- पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील कर्मचारी यांना कायम करणेसाठी राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांची भेट घेऊन शासन सेवेत कायम करणेची मागणी कृती समितीचे वतीने करणेत आली. मंत्रालयात आज पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील स्वच्छ भारत मिशन व जलजीवन मिशन मधील कर्मचारी यांचे प्रश्ना बाबत आज राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांची भेट घेऊन त्यांचा फेटा व उपरणे व श्री विठ्ठलाचा प्रसाद व निवेदन कृती समितीच्या वतीने देणेत आले. या प्रसंगी कृती समितीचे अध्यक्ष रमाकांत गायकवाड, कार्याध्यक्ष सचिन जाधव, उपाध्यक्ष ऋषीकेश शिलवंत, सचिव विकास कुडवे उपस्थित होते.पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील स्वच्छ भारत मिशन व जलजीवन मिशन मधील कर्मचारी यांचे गेल्या ९ महिने पासून थकीत असलेले वेतन तातडीने जिल्हा स्तरावर वितरीत करणे बाबत मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांचे कडे मागणी करणेत आली. सेवेत कायम करणे साठी मुख्य सचिव यांचे कडे प्रस्ताव - मंत्री गुलाबराव पाटील- आज मंत्रालयात पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील जिल्हा स्तरावरील जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन व तालुका स्तवरील बीआरसी सीआरसी यांना शासन सेवेत कायम करणे साठी आज मंत्रालयात राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कंत्राटी कर्मचारी यांचे प्रश्ना बाबत बैठक घेणेत आली. या बैठकीत जिल्हा व तालुका स्तरावरील कर्मचारी या्ना कायम करणेसाठी मुख्य सचिव यांचे अध्यक्षतेखाली नेमणेत आलेले समितीकडे प्रस्ताव पाठविणेत आला असल्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. या प्रसंगी आमदार सुधीर मनगुंटीवर यांनी पत्र देऊन बैठकीचे आयोजन करणेत आले होते. या बैठकीस आमदार सुधीर मनगुंटीवार, प्रकल्प संचालक गंगाथरण, सह सचिव गीता कुलकर्णी, सहसचिव स्नेहा मानकामे, अतिरिक्त अभियान संचालक शेखर रौंदाळ , अतिरिक्त अभियान संचालक देशपांडे, राज्य कृती समितीचे अध्यक्ष रमाकांत गायकवाड, कार्याध्यक्ष सचिन जाधव, उपाध्यक्ष ऋषीकेश शिलवंत रायगड जयवंत गायकवाड, मंत्रालयातील अवर सचिव व इतर अधिकारी उपस्थित होते. येत्या सात दिवसांत वेतना साठी निधी जिल्हा स्तरावर वर्ग करणेत येणार - जलजीवन मिशन साठी वेतना साठी निधी प्राप्त झालेला आहे. तसेच स्वच्छ भारत मिशन ग्रामीण साठी राजे. हिस्सातून निधी उपलब्ध झालेला आहे. सदर निधी या आठवड्यात जिल्हा स्तरावर वर्ग करणेत येणार आहे. याबाबत केंद्रा कडे स्वच्छ भारत मिशन चे निधीची मागणी केली आहे. केंद्राकडून निधी प्राप्त न झालेस राज्य हिस्सातून निधी वर्ग करणेत येणार असल्याचे प्रकल्प संचालक डी गंगाथरण यांनी बैठकीत सांगितले. यावेळी चंद्रपूर जिल्ह्यातील हातपंप कर्मचारी यांना सेवेत कायम करणे बाबत चर्चा झाली.

Post a Comment

Previous Post Next Post