बबलाद जिल्हा परिषद शाळेच्या छताचे काँक्रीट कोसळले ; ६ महिन्यांपूर्वीच झाले होते दुरुस्ती काम: १३ मुलं तर 2 शिक्षक जखमी

अक्कलकोट | बबलाद - बबलाद येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळेतील सिलिंगचा काँक्रिटचा कोसळून प्रभातफेरी आटोपून शाळेच्या व्हरांड्यात थांबलेल्या १३ मुलांसह २ शिक्षक असे १५ जण जखमी झाले. यात ८ विद्यार्थ्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली असून, उपचारासाठी त्यांना अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे. या प्रकारामुळे मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.जखमी मुले आणि शिक्षकांना अक्कलकोट येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी ८ मुलांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. सहा महिन्यांपूर्वी इमारतीची दुरुस्ती झाल्यानंतर अशी घटना घडल्याने पालकांनी चौकशीची मागणी केली आहे. मंगळवारी सकाळी शाळा सुरू असताना स्लॅब कोसळल्याने मुले भयभीत झाली. जखमींमध्ये इयत्ता पहिली, दूसरी, तिसरी, पाचवी, सातवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. स्लॅबचा काही भाग विद्यार्थ्यांच्या अंगावर पडल्याने अनेकांना दुखापत झाली. घटनेनंतर शाळेच्या परिसरात एकच गोंधळ उडाला. शिक्षक आणि ग्रामस्थांनी तातडीने जखमी विद्यार्थ्यांना बाहेर काढून उपचारासाठी व्यवस्था केली,घटनेची माहिती मिळताच दुधनी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सन्मुख विभुते, डॉ. मंजुनाथ पाटील, वाहनचालक विलास पोतदार, सिद्धाराम नंदर्गी, महिबूब मुजावर, सुनीता सूर्यवंशी, जय नाटकर, सुरेश बोईनवाड आदी कर्मचारी तातडीने घटनास्थळी उपचार करून पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यास मदत केली. दरम्यान, पंचायत समितीचे उपसभापती सागर कल्याणशेट्टी, गटविकास अधिकारी शंकर कवितके, दुधनी नगरपालिकेचे नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे नगरसेवक बसवराज हौदे आदींनी घटनास्थळी भेट देऊन जखमी विद्यार्थी व शिक्षकांची विचारपूस केली. राजकुमार लकाबशेट्टी, रमेश रोडगे, चंद्रकांत देगाव, मदन दर्शनाळ, बसवराज पाटील, उ भोगेश्वर फुलारी आदींनीही घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. शाळेच्या इमारतीची सुमारे सहा महिन्यांपूर्वीच दुरुस्ती करण्यात आली होती, अशी माहिती समोर आली आहे.

  'हे' आहेत जखमी मुलं अन् शिक्षक - जखमी झालेल्या विद्याल्यांमध्ये अथर्व मड्डी, श्रीमंत मणुरे,प्रज्वल न्हावी , लक्ष्मीपुत्र खानापुरे, शरणबसप्पा खानापुरे, प्रशांत चांभार , दर्शन चव्हाण प्रशांत बोधले अनुष्का मड्डी सिद्धार्थ पुजारी विशाल अचगोंडा मानसी खानापुरे आणि सिद्धार्थ कलशेट्टी यांचा समावेश आहे. शिक्षकांमध्ये भीमणा गवळी आणि रमेश शिवमूर्ती हे दोघेही जखमी आहेत यापैकी दर्शन चव्हाण प्रज्वल न्हावी प्रज्वल बोदले प्रशांत चांभार प्रशांत मणुरे अथर्व मड्डी आणि सिद्धार्थ पुजारी यांना गंभीर दुखापत झाली आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post