आध्यात्मासह सामाजिक, शैक्षणिक कार्याला वटवृक्ष देवस्थानचे प्राधान्य कौतुकास्पद : सुषमाताई अंधारे

अक्कलकोट (प्रतिनिधी)- येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान ट्रस्टच्या वतीने आध्यात्मिक कार्यासोबतच सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात दिले जाणारे योगदान कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या तथा जिल्हा संपर्कप्रमुख सुषमाताई अंधारे यांनी केले.सुषमाताई अंधारे यांनी श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीशैल गवंडी यांनी त्यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र व प्रसाद देऊन सत्कार केला. यावेळी त्या बोलत होत्या.पुढे बोलताना अंधारे म्हणाल्या की, वटवृक्ष देवस्थान समितीचे कामकाज स्वच्छ, शिस्तबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने सुरू आहे. भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या विविध सोयी-सुविधा पाहून समाधान वाटले. अशा देवस्थानांमुळे आपला धार्मिक व सांस्कृतिक वारसा जतन करण्यास मोठी मदत होते. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात त्यांच्या समोरच माझा सत्कार झाल्याने विशेष आनंद झाला. देवस्थान समितीच्या पुढील कार्यास त्यांनी शुभेच्छा दिल्या.यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शरणराज केंगनाळकर, उमेश सारंग, संजय पोळ, हुकूमचंद राठोड, दत्ता माने, रमेश चौगुले, रवी डोके, सोपानकाका निक्ते, अयाज जमादार, मनोज पवार, गुरुलिंगप्पा पाटील, रवी कोळी, पिंटू पांढरे, राम जाधव, भीम जाधव, राजशेखर गुरव, संतोष पाटील, संतोष टोणपे, महेश फुलारी तसेच देवस्थानचे सचिव आत्माराम घाटगे, सागर गोंडाळ, रमेश शिंदे सर, सचिन हन्नूरे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व स्वामीभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post