अवघ्या तीन तासांत सोन्याच्या दागिन्यांची चोरी उघड; चार महिला आरोपी अटकेत : सदर बझार पोलिसांची दमदार कामगिरी; २ लाख ४० हजारांचा २० ग्रॅम सोन्याचा मुद्देमाल हस्तगत

सोलापूर (प्रतिनिधी)- सातरस्ता ते सोरेगावदरम्यान रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिलेच्या पिशवीतील सुमारे २ लाख ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या चार महिला आरोपींना सदर बझार पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अवघ्या तीन तासांत शोधून काढले. आरोपींकडून चोरीस गेलेले २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे बोरमाळ व सोन्याचे मणीमंगळसूत्र असा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.फिर्यादी काशिबाई कमलाकर पाटील (वय ४५, रा. स्वागत नगर, भाग-२, सोलापूर) या ३ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास सातरस्ता येथून सोरेगावकडे रिक्षाने जात होत्या. कंबर तलाव परिसरात प्रवासादरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या पिशवीत ठेवलेले सोन्याचे बोरमाळ व सोन्याचे मणीमंगळसूत्र चोरून नेले.या प्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ६४०/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०३(२) अन्वये ५ ऑगस्ट २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.गुन्हा दाखल होताच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. घटनास्थळावरून मिळालेली गोपनीय माहिती तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या तीन तासांत अज्ञात आरोपींचा माग काढला.तपासादरम्यान ममता संभाजी भोसले (रा. नरसिंहनगर, अक्कलकोट रोड), पश्चिनी इन्नूस काळे (रा. बिस्मिल्ला नगर, मल्लिकार्जुन नगर), सुषमा बापू चव्हाण (रा. बोरामणी, सध्या किर्तीनगर, मल्लिकार्जुन नगरजवळ) आणि शैला नाशि पवार (रा. बिस्मिल्ला नगर, मुळेगाव रोड, सोलापूर) यांचा सहभाग निष्पन्न झाला. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीस गेलेले २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे बोरमाळ व सोन्याचे मणीमंगळसूत्र असा २ लाख ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ. एम. राजकुमार, पोलीस उपआयुक्त परिमंडळ डॉ. प्रितम यावलकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग-२ श्रीमती विजयालक्ष्मी कुर्री यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) रविंद्रनाथ भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि राहुल सावंत, पोहेकॉ मुलाणी, पोहेकॉ राजेश चव्हाण, पोहेकॉ प्रमोद पकाले, पोहेकॉ बागलकोटे (परिमंडळ), पोको उमेश चव्हाण, पोको हणमंत पुजारी, पोको विशाल बोराडे, पोको अमीन शेख, पोको सागर गुंड, पोको सोमनाथ सुरवसे, पोको काशिनाथ वाडेकर, पोको आनंद निंबाळकर आणि पोको अनमोल लड्डे यांनी ही कामगिरी केली.अवघ्या तीन तासांत चोरीचा छडा लावत संपूर्ण सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केल्याने सदर बझार पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post