सोलापूर (प्रतिनिधी)-१५ ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन तसेच सामाजिक कार्यकर्ते व शिवप्रतिष्ठानचे कार्यक्षम नेतृत्व अजय शेरा चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त अंतरोळीकर नगर येथे शिवप्रतिष्ठानच्या वतीने सलग नवव्या वर्षी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.‘रक्तदान हेच श्रेष्ठदान’ असे म्हटले जाते. रक्तदानाच्या माध्यमातून गरजू रुग्णाला जीवनदान मिळू शकते. युवकांमध्ये रक्तदानाबाबत जनजागृती व सामाजिक बांधिलकी निर्माण व्हावी, या उद्देशाने दरवर्षीप्रमाणे यंदाही या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.यंदाच्या शिबिरात ११० रक्त दात्यांनी रक्तदान केले आहेशिबिराच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून रक्तदानास सुरुवात करण्यात आली. यावेळी अनेक युवकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.या रक्तदान शिबिरास मल्लिकार्जुन ब्लड बँकेचे सहकार्य लाभले. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक सुनील चौधरी यांच्यासह अभि जाधव, अक्षय चौधरी, आदित्य वाघमारे, राज बंदीछोडे, समीर शेख, महेंद्र बऱ्हाणपूरे, बाळासाहेब बनसोडे, मुकिम सालार, अमोल भोसले, राहुल गोरेलेवाले, सचिन कांबळे, आकाश मुदगल, राहुल गायकवाड, अक्षय बबलाद, अविनाश मदनावाले, ॲलन काळे, चेतन ननवरे, संघा वारभुवन, धनंजय पंतुवाले, गणेश मौलावाले, ऋषी घोलप, अभि चौधरी, नितीन मिठू, शुभम पंतुवाले, विनायक लंगडेवाले, गंगाधर सलगर, रोहित साल्फे, विनायक पंतुवाले, अक्षय पुणेकर, लखन बुऱ्हाणपूरे आदी शिवप्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सभासद उपस्थित होते.रक्तदानासारख्या सामाजिक उपक्रमातून वाढदिवस साजरा करण्याचा हा उपक्रम युवकांसाठी प्रेरणादायी ठरला.
Tags:
सोलापूर
