राम हुंडारे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार

दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर (प्रतिनिधी )- पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर शहर अध्यक्ष तथा सारा न्यूज चे संपादक राम हुंडारे यांचा वाढदिवसानिमित्त पत्रकार सुरक्षा समिती वतीने शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना पुढील आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
*पत्रकारांच्या प्रश्नावर राम हुंडारे नेहमीच अग्रेसर*
पत्रकार सुरक्षा समिती वतीने गेली अनेक वर्षांपासून पत्रकार संरक्षण कायदा जेष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना आरोग्य योजना घरकुल योजना राज्यातील युट्युब व पोर्टल ला शासकीय मान्यता पत्रकारांवरील होणारे हल्ले धमकी मारहाण यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्राना पूर्वी प्रमाणे जाहिरात याच बरोबर राज्यातील पत्रकारांच्या प्रश्न व अडचणी बाबत राम हुंडारे यांनी पत्रकार सुरक्षा समिती वतीने आंदोलन उपोषण निवेदन व पत्रव्यवहार करून पत्रकारांचे प्रश्न शासन दरबारात मांडून आक्रमक भूमिका बजावली असून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे.
शहर अध्यक्ष राम हुंडारे यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकार सुरक्षा समितीचे संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार यांच्याहस्ते शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला
यावेळी दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद दैनिक शिवनिर्णय चे वैजिनाथ बिराजदार श्रीकांत कोळी नागनाथ गणपा विजय चव्हाण सुनील जगताप शोएब काझी युनूस अत्तार श्रीनिवास वंगा इत्यादी पत्रकार बांधव उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form