दैनिक_लोकशाही_मतदार
सोलापूर (प्रतिनिधी)- शहरात गेली अनेक वर्षांपासून बेकायदेशीर सावकरी व्यवसाय सुरु असून या बेकायदेशीर सावकारी मुळे अनेकांचे संसार धुळीस मिळाले आहेत तर काहीजण बेसुमार व्याजाने त्रस्त आहेत अश्या बेकायदेशीर सावकारी ला पायबंद घालण्यास उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयास अपयश आले असून फोफावलेल्या सावकारी ला पायबंद नाहीच सावकार बेसुमार व्याज आकारून मालामाल झाले आहेत
सोलापूर शहर हे अनेक जाती धर्मा मध्ये वसलेलं शहर म्हणून प्रसिद्ध आहे या शहरात अनेक यात्रा जत्रा सणं उत्सव मिरवणुका मोठया प्रमाणात असतात उत्सवप्रिय शहर म्हणून आगळी वेगळी ओळख असून एकेकाळी सोलापूर मध्ये सोन्याचा धूर निघत असल्याची महती अनेक जुने जानकार वृद्ध मंडळी सांगतात जुन्या जमान्यात सोलापूर मध्ये नरसिंग गिरजी मिल जाम मिल या सह इतर काही मिल होत्या त्यातून कापड निर्माण होत असे चाटी गल्ली सराफ बाजार सारख्या बाजारपेठा लाभल्याने सोलापूरला वैभव प्राप्त झाले होते कालांतराने सोलापूर मधील वैभव हळूहळू काळाच्या ओघात नष्ट पावले मिल बंद पडल्या अन कामगार देशोधडीला लागले बेरोजगारी वाढली कमावणार एक अन खाणार चार अशी अवस्था सुरु झाली यात राजकारण आल्याने सोलापूर चा विकास ऐवजी भकास झाला.
सावकारांची वाढती संख्या अन जनतेची लूट
सोलापूर शहरात सावकरी परवाना देणे व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालय असून याच कार्यालयातून सावकारी परवाना म्हणजेचं कमी दराने व्याज बट्टा व्यवसाय करण्यासाठी मंजुरी दिली जाते सावकारी परवाना देताना अनेक नियम धाब्यावर बसवले जातात सावकार सरकारी नियमानुसार व्याज घेतो की नाही हे देखील पाहिलं जातं नाही सर्व नियमांना हरताळ पासून पाहिजे तसं व्याज आकरलं जातंय
वास्तविक पाहता सावकारी परवाना देताना अनेक नियम अटी असतात परंतु नियम करणारेच नियम पायदळी तुडवतात लक्षमी चे दर्शन झाले की कसले नियम व कुठला कायदा? ठराविक रक्कम मिळाली की दिला जातोय परवाना.
सोलापूर शहरात परवाना नसलेले व असलेले अनेक सावकार असून पाच टक्के दहा टक्के वीस टक्के पर्यंत हे सावकार समोरच्या व्यक्ती ची गरज पाहून व्याज आकारतात त्यासाठी कोरे चेक बॉण्ड घेतात वेळ प्रसंगी घरजागा शेती लिहून घेतात त्याच बरोबर शेती घरजागेवर कब्जा देखील करतात संबंधीत व्यक्ती कडून व्याज देण्यात उशीर झाल्यास मारामाऱ्या शिवीगाळ देखील करतात भरमसाठ व्याज घेतल्याने अनेक सावकार मालामाल झाले असून अंगावर मोठया प्रमाणात सोने घालून व महागड्या गाडीतून फिरताना दिसतात व्याजाने पैसे घेणारा मात्र कंगाल होतोय गरीब असल्यामुळे तो कोठेही तक्रार करू शकत नाही याचाच फायदा हे बेकायदेशीर सावकार घेतात.बेसुमार व्याज भरून शहरातील अनेक लोक भिकेला लागले आहेत
सोलापूर शहरात व्याज बट्टा म्हणजे सावकारी व्यवसाय अतिशय मोठया प्रमाणात सुरु असून अनेक सावकार शेत जमीन घरजागा बळकावल्याच्या बातम्या आपण वाचतो सावकारच्या या कृती ला पायबंद घालण्यासाठी कारवाई करण्याचे अधिकार शहर उपनिबंधक कार्यालयाला असून आता हेच उपनिबंधक कार्यालय वादाच्या भोवऱ्यात सापडलेले दिसत आहे. भरमसाठ व्याज आकारणाऱ्या सावकारवर कारवाई तर सोडाच बेसुमार व्याजात खपलेल्या माणसांची साधी तक्रार देखील उपनिबंधक कार्यालय घेत नसल्याची गंभीर बाब समोर येत आहे.
अश्या बेकाबू सावकारावर कारवाई होणे गरजेचे आहे.
.jpeg)