अरे वा! बातमी ऐकलात का सोलापूरकरांनो ; विजापुर नाक्याने केले चोरट्यांकडून तब्बल १०६ महागडे मोबाईल जप्त : पोलीस निरीक्षक दादासाहेब गायकवाड यांच्या पथकाची दमदार कामगिरी



दैनिक_लोकशाही_मतदार

सोलापूर (प्रतिनिधी)- विजापुर नाका पोलीस ठाणे कडील पोशि/अमृत सुरवसे व पोशि/समाधान मारकड नवरात्रीच्या अनुशंगाने पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना दि. ०३/१०/२०२४ रोजी दुपारी १२.१५ वच्या सुमारास पुणे पासिंग असलेली पांढ-या रंगाची एर्टिगा एम.एच. 13-TD-2258 ही पांढ-या रंगाची एर्टिगा एम.एच. 12 - TD 2238 ही गाडी संशयित रित्या हत्तुरेवस्ती येथे दिसुन आल्याने पोशि/सुरवसे व पोशि/मारकड यांना सदर गाडीचा संशय आल्याने त्यांनी त्या गाडी पाठलाग करून संशयित एर्टिगा एम.एच. 12 TD 2238 ही चारचाकी वाहन ही सपोनि गायकवाड व पोहेकॉ सचिन हार, गणेश शिर्के, शंकर भिसे, पोशि/संतोष माने, सद्दाम आबादीराजे, स्वप्निल जाधव, हरिकृष्ण चोरमुले यांच्या मदतीने वरील संशियत पांढ-या रंगाची एर्टिगा एम.एच. 12 TD 2238 पत्रकार भवन येथील सुरभी हॉटेलच्या समोर अडवून इसम नामे १) विशाल कृष्णाप्पा बंडीवडार वय २९ वर्षे, रा- कुमारेश्वर नगर कोर्टाच्या पाठीमागे, ता. हनगल जिल्हा हावेरी, राज्य कर्नाटक २) अनिल शिवप्पा वडर वय वर्षे, रा. नवनगर, मैलारी देवी मंदीर जवळ, ता, हनगल, जिल्हा हावेरी, राज्य कर्नाटक यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातुन दरोडासाठी लागणारे १) एक निळ्या रंगाची मुठ असलेला लोखंडी मोठा कटर, २) एक गुलाबी मुठ असलेली लहान लोखंडी कटर, ३) एक जुने लोखंडी पत्रे कापण्याचे कटर ४) एक केसरी रंगाचा लोखंडी कु-हाड, ४) एक निळ्या एक्सा ब्लेड, ५) एक लोखंडी कटावणी, ६) एक हिरवी मुठ असलेली स्क्रू ड्रायव्हर, ७) एक हिरव्या रंगाचे इलेक्ट्रीक कटर मशिन, ८) लाल तिखट न्युज पेपर मध्ये बांधलेली, ९) एक लोखंडी हातोडी विविध कंपनीचे ५ मोबाईल असे मुद्देमाल जप्त केला.

सदर गुन्ह्याचे तपासादरम्यान वरील अटक आरोपीतांनी व त्यांचे पळुन गेलेल्या साथीदारांनी दरोडा टाकण्याकरिता आणलेल्या एर्टिगा कारच्या पाठीमागील हॅन्डरेस्ट व पत्र्याच्या मोकळ्या जागेत पुणे व सोलापूर जिल्ह्यातील चोरी केलेले एकुण १०६ विविध कंपनीचे महागडे मोबाईल जप्त करून वरील दोन्ही आरोपीतांकडुन एकुण ४९,११,४०० रूपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त केलेल्या १०६ मोबाईल बाबत अधिक तपास चालु आहे.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम. राजकुमार पोलीस उपायुक्त ,आयुक्त (परीमंडळ) विजय कबाडे  सहा. पोलीस आयुक्त  यशवंत गवारी वरिष्ठ पोलीस निरिक्षक   श्रीमती संगिता पाटील (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सपोनि/गायकवाड, पोहेकॉ/सचिन हार, गणेश शिर्के, शंकर भिसे, पोकों/ अमृत सुरवसे, समाधान मारकड, संतोष माने, शाबोद्दीन आबादीराजे, स्वप्निल जाधव, राहुल विटकर, रमेश कोर्सेगाव व मोबाईल तांत्रिक विश्लेषक/अयाज बागलकोटे व अर्जुन गायकवाड यांनी पार पाडली.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form