पत्रकार राम हुंडारे व पत्रकार संतोष कासे यांचा वाढदिवसानिमित्त आप्पासाहेब लंगोटे मित्रपरिवारातर्फे सत्कार

 


सोलापूर-सारा न्यूज नेटवर्कचे संपादक राम हुंडारे तसेच जनक क्रांती न्यूजचे पत्रकार संतोष कासे यांच्या वाढदिवसानिमित्त आप्पासाहेब लंगोटे मित्रपरिवाराच्या वतीने त्यांचा मानाची टोपी, शाल पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन जिल्हा परिषद परिसरातील बागेमध्ये सत्कार करण्यात आला. हा सत्कार पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमावेळी पत्रकार विजयकुमार लोंढे यांनी मनोगत व्यक्त करत उपस्थित दोन्ही पत्रकार बांधवांचे शब्दसुमनांनी स्वागत केले. त्यांनी दोघांच्या पत्रकारितेतील कार्याचा गौरव करत त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी पत्रकार कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे, यशवंत पवार, रेल्वे पोलीस उपनिरीक्षक तांबोळी साहेब, विजयकुमार लोंढे, अक्षय बबलाद, मिलिंद प्रक्षाळे, नागेश पासकंटी, सलाउद्दीन शेख, ज्येष्ठ पत्रकार इकबाल शेख, नितीन करजोळे, साजिद शेख, नितीन कांबळे, युनुस अत्तार, गिरमल्ला गुरव, मुसा अत्तार, ज्येष्ठ पत्रकार अरूण सिडगिद्दी, नरेन कांबळे, अशोक ढोणे, विजयकुमार उघडे, सुधीर डोळ्ळे, मुस्ताक शेतसंदी, नरेन सब्बन, सत्यम गायकवाड, शाहीद शेख आदींसह पत्रकार कृती समितीचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांनी दोन्ही पत्रकारांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

Post a Comment

Previous Post Next Post