सोलापूर (प्रतिनिधी)- शहरात स्वस्त धान्य दुकानदारांकडून मिळणाऱ्या रेशन तांदळाचा काळाबाजार सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. गरिबांसाठी असलेला तांदूळ बाजारात जास्त दराने विक्रीसाठी वळवला जात असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, काही अप्रामाणिक विक्रेते रेशन दुकानातून मोठ्या प्रमाणात तांदूळ गोळा करून तो खुले बाजारात किंवा हॉटेल व्यवसायिकांना विकत असल्याचा प्रकार सुरू आहे. यामुळे खऱ्या लाभार्थ्यांना मात्र योग्य प्रमाणात धान्य मिळत नसल्याची तक्रार वाढत आहे.काही ठिकाणी लाभार्थ्यांच्या नावावर धान्य उचलले जात असले तरी प्रत्यक्षात त्यांना पूर्ण वाटप केले जात नसल्याचेही निदर्शनास आले आहे. या प्रकारामुळे शासनाच्या अन्नसुरक्षा योजनेला मोठा धक्का बसत आहे.यातच भर म्हणून सोलापूर शहरात खुलेआम प्रशासनाच्या डोळ्यात माती घालून रेशन तांदळाची पळवापळवी होत असल्याचे चित्र लोकशाही मतदाराच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहे कोणाचा माल? कुठे जातोय ? या रेशन माफियांना कोणाचा अभय आणि आशीर्वाद ? याचे सविस्तर वृत्त लवकरच दैनिक लोकशाही मतदार या वृत्तपत्रात प्रसारित होणार आहे.
सोलापूरात रेशन माफियांचा सुळसुळाट : खुलेआम प्रशासनाच्या डोळ्यात माती घालत तांदळाची पळवापळवी सुरू : कोणाचा माल? कुठे जातोय ? वाचा सविस्तर वृत्त लवकरच..
byदैनिक लोकशाही मतदार
•
0
Tags:
सोलापूर
