डॉ कीर्तीपाल गायकवाड " धम्मरत्न " पुरस्काराने आज होणार सन्मानित

 


सोलापूर (प्रतिनिधी)-अखिल भारतीय प्रबुद्ध नाट्य परिषदेचे अध्यक्ष, ऐतिहासिक धम्मभूमीचे प्रवक्ते डॉ कीर्तीपाल गायकवाड यांना धम्मरत्न पुरस्कार जाहीर झाला असून ,येथील प्रबोधन विचार मंच च्या वतीने 135 वा भिमजयंती पुरस्कार सोहळा 2026 दि.25 एप्रिल रोजी सायंकाळी 6 : 00 वाजता डॉ निर्मलकुमार फडकुले सभागृहात संपन्न होत आहे यावेळी या पुरस्काराचे वितरण होणार आहे. महामानवाचे महास्वप्न असलेल्या ऐतिहासिक धम्मभूमीच्या निर्मितीसाठी, धम्मभूमीचे विकासप्रनेते भीमपुत्र टेक्सास गायकवाड यांच्या समवेत गेली 35 वर्षे संघर्ष करून धम्मभूमी उभी करण्यात,( ऐतिहासिक धम्मभूमीचे पहिल्या टप्प्यातील बांधकाम पूर्ण करण्यात) डॉ कीर्तीपाल यांचे विशेष योगदान असल्याने त्यांना हा पुरस्कार मिळत आहे.या पुरस्कार समारंभासाठी विशेष अतिथी म्हणून भिक्षुनी माता धम्मचारीणी उपस्थीत राहणार असून त्यांच्याच हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे.या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार डॉ.ज्योती वाघमारे , कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमदार राजू खरे हे उपस्थित राहणार आहेत याशिवाय बाबा न्यायनित,अमोल शिंदे,राहुल डंबाळे, संजय पाईकराव हेही उपस्थित राहणार आहेत.यावेळी नूतन राज्यसभा खासदार झाल्याप्रित्यर्थ डॉ.ज्योती वाघमारे यांचा विशेष सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती प्रबोधन विचार मंचचे अध्यक्ष विश्वास गायकवाड यांनी दैनिक लोकशाही मतदारशी बोलताना दिली.दैनिक लोकशाही मतदार चे निवासी संपादक डॉ कीर्तिपाल यांना यापूर्वी ऐतिहासिक धम्मभूमीचा, प्रबुद्ध साहित्यरत्न हा राष्ट्रीय पुरस्कार तर मलेशिया येथे जागतिक आंबेडकर साहित्य संमेलनात डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. सदरचा धम्मरत्न पुरस्कार हा सोलापूरचा असल्याने आपण हा पुरस्कार आनंदाने स्वीकारत असल्याचे डॉ कीर्तीपाल गायकवाड सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post