शिवसेना राज्य संघटकपदी फतेहसिंह भोसले यांची नियुक्ती

 

पुणे(प्रतिनिधी) – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी देण्याच्या दृष्टीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार फतेहसिंह ऊर्फ बाबासाहेब महादेवराव भोसले-पाटील यांची शिवसेना राज्य संघटक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.याबाबतची अधिकृत माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीसाठी जारी करण्यात आलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आली. पक्ष संघटनेच्या विस्तारासह राज्यभरातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि विविध आघाड्यांमधील समन्वय अधिक प्रभावीपणे साधण्यासाठी ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे.फतेहसिंह (बाबासाहेब) भोसले-पाटील यांनी यापूर्वी विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रांत सक्रियपणे काम केले असून, पक्षाच्या विचारधारेचा प्रसार आणि संघटन वाढीसाठी त्यांनी सातत्याने योगदान दिले आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि नेतृत्वाचा लाभ राज्यातील पक्ष संघटनेला होणार असल्याचा विश्वास पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केला आहे.या नियुक्तीनंतर राज्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची संघटनात्मक घडी अधिक मजबूत करण्यासाठी भोसले-पाटील यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तसेच विविध राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या नियुक्तीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.दरम्यान, भोसले-पाटील यांच्या नियुक्तीबद्दल पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. नवीन जबाबदारीत पक्षवाढ, संघटन मजबुतीकरण आणि कार्यकर्त्यांशी संवाद वाढविण्यावर भर देणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केल्याचे समजते.

Post a Comment

Previous Post Next Post