पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी

सोलापूर(प्रतिनिधी) – पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त पत्रकार कृती समिती व अप्पाश्री लंगोटे मित्र परिवाराच्या वतीने चार हुतात्मा पार्क चौक येथे अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.यावेळी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या लोककल्याणकारी, न्यायप्रिय आणि आदर्श प्रशासनाचा गौरव करत त्यांच्या कार्याला कृतज्ञतापूर्वक स्मरण केले.कार्यक्रमास पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब वाघमोडे, नितीन करजोळे, मिलिंद प्रक्षाळे, अशोक ढोणे, सिद्धाराम नंदर्गी, अकबर शेख, विश्वनाथ बिराजदार, विजयकुमार झुंजा, नरेंद्र संब्बन, उपेंद्र गायकवाड, सुधीर ढोले यांच्यासह पत्रकार, माहिती अधिकार कार्यकर्ते व विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी उपस्थितांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा व कार्याचा आदर्श समाजापुढे कायम ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रमाचे वातावरण उत्साहपूर्ण, प्रेरणादायी आणि भावपूर्ण होते. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतींना अभिवादन करत त्यांच्या लोकहितकारी कार्याचा वारसा जपण्याचे आवाहन करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post