सोलापूर (प्रतिनिधी)-फौजदार चौंडी पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष, प्रामाणिक आणि जनतेप्रती सदैव तत्पर असलेले पोलीस अधिकारी रविंद्र परबत यांची सहाय्यक फौजदारपदी पदोन्नती झाल्याबद्दल पत्रकार कृती समिती व अप्पाश्री लंगोटे मित्र परिवाराच्या वतीने जिल्हा परिषद येथील बागेत भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.यावेळी शाल, टोपी व पुष्पहार अर्पण करून रविंद्र परबत यांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या कर्तव्यनिष्ठा, शिस्तबद्ध कार्यपद्धती, प्रामाणिक सेवा आणि जनसामान्यांशी असलेल्या सुसंवादामुळे त्यांना ही पदोन्नती मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. तसेच त्यांच्या पुढील सेवाकार्यात अधिक यश संपादन व्हावे, उत्तम आरोग्य लाभावे आणि जनसेवेचा वसा अधिक प्रभावीपणे सुरू राहावा, अशा शुभेच्छाही देण्यात आल्या.हा सत्कार सोहळा तिसरी आंख मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार आंबा तळभंडारे, अशोक ढोणे, नितीन करजोळे, मिलिंद प्रक्षाळे, सिद्धाराम नंदर्गी, गिरमल्ला गुरव, डॉ. कीर्तीपाल गायकवाड, अक्षय बबलाद, सुरेश पाटील, आदर्श व्हसुरे, महेश जाधव, सुधीर ढोले, ऋषिकेश ढेरे आणि शाहिद शेख यांच्यासह अप्पाश्री मित्र परिवाराचे सदस्य, पत्रकार बांधव आणि विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी मान्यवरांनी रविंद्र परबत यांच्या जनहिताच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले. पोलीस सेवेत त्यांनी बजावलेली जबाबदारी, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी केलेले प्रयत्न आणि सर्वसामान्य नागरिकांशी ठेवलेले स्नेहपूर्ण संबंध यांचा विशेष उल्लेख करण्यात आला.सत्कार सोहळा आनंददायी, प्रेरणादायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात रविंद्र परबत यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला.
Tags:
सोलापूर
