सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला पाठिंबा; 20 जुलै रोजी सोलापूरात धरणे आंदोलन

सोलापूर (प्रतिनिधी)- प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ, संशोधक आणि पर्यावरणवादी सोनम वांगचूक यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी सोनम वांगचूक समर्थन समिती, सोलापूर यांच्या वतीने सोमवार, 20 जुलै 2026 रोजी दुपारी 12.00 ते 3.00 या वेळेत पूनम गेट परिसरात धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती समितीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.        प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, स्पर्धा परीक्षांमधील कथित पेपरफुटीच्या घटनांमुळे देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकारामुळे गुणवंत तरुणांना रोजगाराच्या संधी गमवाव्या लागत असून, अनेक युवक मानसिक तणाव आणि नैराश्याला सामोरे जात आहेत. या पार्श्वभूमीवर सोनम वांगचूक आणि विविध विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी दिल्लीतील जंतर-मंतर येथे उपोषण करत असून, त्यांच्या आंदोलनाकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देऊन योग्य तोडगा काढावा, अशी समितीची मागणी आहे.सरकारने आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत संवादातून प्रश्न सोडवावेत, तसेच विद्यार्थ्यांवरील अन्यायाविरोधात जनजागृती करण्यासाठी सोलापुरात हे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.या आंदोलनात सोलापूर शहरातील नागरिक, विद्यार्थी, युवक तसेच विविध सामाजिक संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सोनम वांगचूक समर्थन समिती, सोलापूर यांच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आले आहे. याप्रसंगी फारुख शेख, सच्चिदानंद व्हटकर, टी. ए. लोहार, अशोक अगावणे, संतोष धोत्रे, डॉ.किर्तीपाल गायकवाड आदी उपस्थितीत होते.

Post a Comment

Previous Post Next Post