सुरवसे बालक मंदिरात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

 


सोलापूर (प्रतिनिधी)- आसरा सोसायटीतील सुरवसे बालक मंदिर येथे गुरुपौर्णिमेचा पवित्र उत्सव भक्तिभाव, आनंद आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. ज्ञान, संस्कार आणि गुरूंच्या ऋणाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये रुजविणाऱ्या या कार्यक्रमाला शाळेच्या विश्वस्त माननीय राखीताई सुरवसे, मुख्याध्यापिका शुभांगी लोखंडे, प्राथमिक विभागाचे प्रमुख डांगे सर, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते व्यासमुनी व देवी सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी गुरूंच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.कार्यक्रमात लहान गटातील कु.कनक बागल आणि मोठ्या गटातील कु. त्रिशा सोनवणे यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व आपल्या प्रभावी भाषणातून उलगडत गुरुवर्यांप्रती आदरभाव व्यक्त केला. तसेच प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी विविध सांस्कृतिक उपक्रमांमधून गुरूंच्या महान परंपरेला अभिवादन केले.संपूर्ण कार्यक्रम आनंददायी, प्रेरणादायी आणि संस्कारमय वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत गुरू-शिष्य परंपरेचा गौरव केला. अशा प्रकारे सुरवसे बालक मंदिरात बालचमूच्या सहभागातून गुरुपौर्णिमा उत्साहात आणि संस्मरणीय वातावरणात साजरी करण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post